Ticker

6/recent/ticker-posts

ई-सिगारेट, प्रतिबंधित हुक्क्यासाठीचे पाऊच खुलेआम विक्रेत्यावर कारवाई

दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885


नाशिक :-शहरातील गंगापूर रोड परिसरातील पानटपरीवर ई . सिगारेट व प्रतिबंधित हुक्क्यासाठीचे पाऊच खुलेआम व्रिकी केली जात असल्याचे उघडकीस आले आहे . याप्रकरणी पानटपरी चालकाला शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली असून , सुमारे ६० हजारांचा प्रतिबंधित माल हस्तगत केला आहे . शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांना गंगापूर रोड परिसरातील पान टपरीवर प्रतिबंधित ई . सिगारेट व हुक्का पाऊचची विक्री होत असल्याची खबर मिळाली होती . यासंदर्भात बागुल यांनी वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर युनिट एकचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर रोडवरील नेरलीकर सर्कल येथील जय गणेश स्टोअर्स या पानटपरीवर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला . संशयित पानटपरीचालक प्रकाश राजाराम जाधव यास अटक केली . त्याच्या टपरीतून परदेशी बनावटीचा तंबाखुयुक्त इलेक्ट्रॉनिक्स हुक्का असलेला प्रतिबंधित ई - सिगारेटची विक्री केली जात होती . यासाठी वापरण्यात येणारे विविध फ्लेवरचे तंबाखुयुक्त ५५ ई - सिगारेट , अल्टीमेट प्री रोल कोन ब्राऊन पेपरचे ५० नग , हुक्का तंबाखुचे वेगवेगळे फ्लेवरचे ३० पाऊच , ३ हुक्का पॉट पाईप , हुक्का पिण्याचे फिल्टर असा सुमारे ६२ हजार ९ ५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे . याप्रकरणी गंगापूर पोलिसात पोलीस अंमलदार प्रशांत मरकड यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदरची कारवाई युनिट एकचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ , उपनिरीक्षक विष्णु उगले , रवींद्र बागुल , आसिफ तांबोळी , नाझिम खान , प्रशांत मरकड , विशाल देवरे यांनी केली आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या