Ticker

6/recent/ticker-posts

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

लाखनी तालुक्यातील नरव्हा येथील घटना 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :- घरी कोणी नसल्याची संधी साधून राहते घरी नायलॉन रस्सी ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार(ता.१९) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. मृतक युवकाचे नाव किरण लालाजी उपरिकर(२१) रा. नरव्हा, तालुका लाखनी असे आहे. पालांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 
        मृतक किरण हा मोटारसायकल दुरुस्तीचे काम करीत असून त्याने आपले मालकाकडेच मुक्काम केला होता व सकाळीच घरी परत आला होता. भाऊ व वडील सकाळी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. तर आई शेतावर पाळीव जनावरांसाठी वैरण आणायला गेली होती. ती घरी परत आली असता मृतक किरण नायलॉन दोरीने गळफास घेऊन दोरी तुटून खाली पडून मेलेल्या अवस्थेत दिसून आल्याने मोठा मुलगा प्रशांत उपरिकर यास भ्रमणध्वनीवरून माहिती दिल्याने त्याने घरी येऊन पाहिले असता किरण मृतावस्थेत दिसून आला. घटनेची माहिती पालांदूर पोलिसांना देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे, पोलिस नायक नावेद पठाण, महिला पोलिस हवालदार सिंगनजुडे मॅडम यांनी घटनास्थळी जाऊन सर्व सोपस्कार आटोपून मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविला. मर्ग क्रमांक १३/२०२२ कलम १७४ सीआरपीसी नुसार पालांदूर पोलिस तपास करीत आहेत. मन मिळावू किरण च्या अकाली निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या