Ticker

6/recent/ticker-posts

विदर्भ अर्थशास्त्र परिषद सुवर्ण महोत्सवी व्याख्यानमाला

दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885


गडचिरोली :-गोंडवाना विद्यापीठ , पदव्युत्तर शैक्षणिक उपयोजित अर्थशास्त्र विभाग आणि विदर्भ अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ अर्थशास्त्र परिषद सुवर्ण महोत्सवी व्याख्यानमाला स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि आधुनिक ग्रामविकासाची दिशा या विषयावर उद्या ०५ डिसेंबर २०२२ ला सकाळी ११ वाजता आयोजीत करण्यात आली आहे . कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक कुलगुरू डॉ . प्रशान्त बोकारे , प्रमुख अतिथी म्हणून प्र - कुलगुरू डॉ . श्रीराम कावळे , कुलसचिव डॉ . अनिल हिरेखन , कार्याध्यक्ष विदर्भ अर्थशास्त्र परिषद डॉ . निवृत्ती पिस्तुलकर , सचिव , विदर्भ अर्थशास्त्र परिषद , अमरावती विभाग डॉ . संजय कोठारी , सचिव , विदर्भ अर्थशास्त्र परिषद नागपूर विभाग डॉ . विठ्ठल घिनमिने तर प्रमुख वक्ता म्हणून सुप्रसिद्ध अर्थतज्ञ नागपूर डॉ . श्रीनिवास खांदेवाले राहतील . या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचा आवाहन करण्यात आले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या