Ticker

6/recent/ticker-posts

अण्णाभाऊ साठे विचारमंचाची स्थापना

दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885


 रायगड :-महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या विकासासाठी बार्टीने केलेल्या असंख्य कल्याणकारी योजना पाहून आपण भारावून गेलो आहोत . बार्टी ही मातंग समाजाला प्रगतीच्या आणि विकासाच्या दिशेने घेऊन जाणारी संस्था आहे . भविष्यकाळात बार्टी ही मातंग समाजाच्या प्रगतीचे व विकासाचे केंद्र बनेल असा विश्वास महाराष्ट्रातील जेष्ठ साहित्यीक डॉ . श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केला . बार्टी मुख्यालयात आयोजित केलेल्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुरोगामी विचारमंच या नावाने स्थापन झालेल्या संस्थेच्या बैठकीच्या अध्यक्षपदावरून डॉ . सबनीस बोलत होते . यावेळी बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या प्रमुख उपस्थित ही बैठक आज रोजी संपन्न झाली . डॉ . सबनीस पुढे म्हणाले की , गजभिये यांनी महाराष्ट्रातील उपेक्षित वंचित मातंग समाजाला प्रगती आणि विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत . मग त्या योजना विद्यार्थ्यापासून ते उद्य जकापर्यंत आणि स्पर्धा परीक्षापासून ते स्त्रियांच्या बचतगटापर्यंत मातंग समाजातील कलाकार शासनाच्या योजना , महिला सबलीकरण ते जात पडताळणी असे एकाहून एक सरस योजना बार्टीने मातंग समाजासाठी राबवल्याचे पाहून डॉ . सबनीस यांनी महासंचालक गजभिये यांचे कौतुक केले . लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे कार्य हे वैश्विक असून , ते जाती मर्यादीत न ठेवता मातंग समाजाने त्या विचारांची वाढ साहित्य , कला आणि संगीत याच्या माध्यमातून जतन करून ठेवले पाहिजे . त्यासाठी बार्टी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे सारे साहित्य नजीकच्या काळात प्रकाशीत करण्याचा प्रयत्न करणार आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या