Ticker

6/recent/ticker-posts

भिमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समनवय समितीच्या वतीने महिला कार्यकर्त्यांच्या नियोजन बैठक


रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५


पुणे :- शौर्य दिन नियोजनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांचे समवेत भिमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समनवय समितीच्या वतीने महिला कार्यकर्त्यांच्या नियोजन बैठक आयोजीत करण्यात आली होती.
​सदर शौर्यदिन उत्सवासाठी यंदाच्या वर्षी किमान दहा कोटी रुपयांची तरतुद करण्यात याव यासह खालील मागण्या करण्यात आल्या आहेत.
1) महिलांसाठी नियोजन करणेस्तव आपल्या अधिकारात महिला समन्वय समिती स्थापन करण्यात यावी.
2) अभिवादनासाठी महिलांना दोन स्वतंत्र मार्गीका करण्यात याव्यात.
3) विजयस्तंभ परिसर व अभिवादन मार्गीका येथे महिला पोलीसांचा अतिरिक्त बंदोबस्त करण्यात यावा.
4) महिलांसाठी विजयस्तंभ परिसरामध्ये राहण्यासाठी व तात्पुरता आराम करण्यासाठी किमान पंचविस हजार फुटांचा सर्व सोयी सुविधांसह स्वतंत्र मंडप उभारण्यात यावा.
5) विजयस्तंभा पर्यंत जाण्यासाठी महिलांच्या स्वतंत्र बस व्यवस्था करण्यात यावी.
6) विजयस्तंभ परिसरामध्ये महिला साहय्यता कक्ष उभारण्यात यावा.
7) विजयस्तंभ परिसरामध्ये हिरकणी कक्ष उभारण्यात यावे.  
8) महिलांसाठी जास्तीत जास्त फिरते व तातपुरते शौचालय उभारण्यात यावे.
9) महिलांसाठी जास्तीत जास्त फिरते व तातपुरते स्नानगृह उभारण्यात यावे
10) सॅनिटरी नॅपकीनची मोफत व्यवस्था करण्यात यावी.
आदी मागण्या करण्यात आल्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या