रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
सातारा : - श्री बिरोबा मंदिर सभा मंडप कामाचा भूमिपूजन सोहळा खासदार विकास महात्मे यांच्या हस्ते संपन्न झाला.
तालुका वाई जिल्हा सातारा येथील श्री बिरोबा मंदिर सभा मंडप निर्माणकार्यासाठी खासदार विकास महात्मे यांच्या स्थानिक खासदार निधीतून ८ लक्ष रुपये देण्यात आले आहेत.या सभा मंडपाचे भूमिपूजन खासदार विकास महात्मे यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाला कार्यक्रमास सातारा जिल्हाप्रमुख (बाळासाहेबांची शिवसेना) पुरुषोत्तम जाधव,प्रदेश युवा मोर्चा सदस्य प्रा. सचिन जायभाये, धनगर समाज संघर्ष समिति सातारा जिल्हा अध्यक्ष गणेश वळकुंदे,भूषण शिंदे, हिंदुराव हाके,कृष्णा बरकडे तसेच गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
खरं तर अनेक वर्षांची स्थानिकांची मागणी होती.श्री. बिरोबा मंदिर वाई देवस्थान हे जागरूक देवस्थान असून भक्त येथे दंडवत करत देवाला प्रार्थना करतात.त्यामुळे याठिकाणी सभा मंडप आवश्यक होते असे खासदार विकास महात्मे यावेळी म्हणाले.


0 टिप्पण्या