Ticker

6/recent/ticker-posts

सर्वांगीण शिक्षण विद्यालयातील १० गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप

बायोस्टेड इंडिया लिमिटेड मुंबई व हितभव कृषी केंद्र पिंडकेपारचा उपक्रम

चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली :-बायोस्टेड इंडिया लिमिटेड मुंबई व हितभव कृषी केंद्र पिंडकेपार यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक दायित्व म्हणून पिंडकेपार येथील सर्वांगीण शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील वर्ग १० वी च्या १० गरीब, गरजू, हुशार व  होतकरू विद्यार्थ्यांना  बायोजाइम प्रगती शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. या शिष्यवृत्तीच्या अनुसंगाने प्रत्येकी ३००० रुपये निवडक १० विद्यार्थ्यांचा बँक खात्यात जमा करण्यात आले. 
     या अनुसंगाने दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी प्राचार्य अमोल हलमारे यांच्या मार्गदर्शनात  विद्यालयाच्या महात्मा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित एका छोटेखाणी कार्यक्रमात बायोस्टेडच्या वतीने या  १० विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यात विद्यालयातील या लाभार्थी  विद्यार्थ्यांचा समावेश होता. या कार्यक्रमात बायोस्टेड इंडिया लिमिटेडचे  वरिष्ठ एरिया सेल्स मॅनेजर राजेश नोन्हारकर, हितभव कृषी केंद्राचे संचालक योगेश चांदेवार, प्रतिनिधी योगेश कापगते, सुनील तूरकर, खुमेश समरीत, विद्यालयाचे पर्यवेक्षक बाळकृष्ण दोनोडे, उपमुख्याध्यापक प्रभाकर चांदेवार आदी मान्यवर उपस्थित होते.
   सेल्स मॅनेजर राजेश नोन्हारकर यांनी बायोजाइम उत्पादनांचे उपयोग, जैविक व  टिकाऊ कृषि तसेच  पर्यावरण -पूरक शेतीचे महत्व याबाबतीत माहिती दिली. सध्या परिस्थितीत कृषि क्षेत्रात अशा तंत्रज्ञानाचा विकास करणे  आवश्यक आहे, ज्यामुळे  उत्पादनाबरोबरच माती, पाणी व पर्यावरणाचे संरक्षण देखील होईल. त्यांनी सांगितले की शिष्यवृत्ती देण्याचा  हेतू विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्या बरोबरच त्यांना पुढे जाण्यासाठी  आत्मविश्वास निर्माण करणे हा आहे.
प्रास्ताविक योगेश चांदेवार यांनी तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन  बाळकृष्ण दोनोडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या