Ticker

6/recent/ticker-posts

जुनी पेन्शन योजना लागू करा ! ‘या’ संघटनेनं दिलंय निवेदन!

रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५

नाशिक -:
महाराष्ट्र राज्य शासन सेवेतल्या खासगी शाळांतल्या कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 नियम 19 (निवृत्तीवेतन) आणि नियम 20 ( भविष्य निर्वाह निधी ) यामध्ये महाराष्ट्र खासगी शाळांतल्या कर्मचारी विनियमन अधिनियम 1977 मधील कलम 4 ( 1) मधील तरतुदीनुसार कुठलाही बदल न करता राबविण्यात येत असलेली DCPS / NPS योजनेची अंमलबजावणी तात्काळ थांबविण्यात यावी आणि त्याऐवजी खागगी शाळांतल्या कर्मचाऱ्यांना सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी (1982 ची जुनी पेन्शन योजना ) पूर्वलक्षी प्रभावाने पूर्वरत लागू करावी.

अशा आशयाचं एक निवेदन स्वाभिमानी शिक्षक, शिक्षकेत्तर संघटना, महाराष्ट्र राज्य, नाशिक या संघटनेनं शासन दरबारी नुकतंच दिलंय.


या संदर्भाला अनुसरुन सदर नमूद कर्मचाऱ्यांना DCPS / NPS योजनेची अंमलबजावणी तात्काळ थांबवून खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांना सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी ( 1982-1984 ची जुनी पेन्शन योजना ) पूर्वलक्षी प्रभावाने पूर्वरत लागू करण्याबाबत आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांना निवेदन प्राप्त झालेले आहे.

सदर निवेदन सदर आदिवासी विकास विभागाकडून राज्याचे सचिव आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांना सादर करण्यात आलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या