पाणी टंचाईची समस्या मार्गी लागणार
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :- अत्याधिक पाणी उपस्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली होती. त्यामुळे काही गावातील ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असे. यावर मात करण्यासाठी काही गावात शोषखड्डे तयार करण्यात येऊन त्यात आंघोळ केलेले तथा धुणीभांडी केलेले निरुपयोगी पाणी मुरविल्याने त्या गावातील भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होत असून उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या विहिरीत पाणी दिसून येते त्यामुळे टंचाईग्रस्त गावातील पिण्याचे पाण्याची समस्या मार्गी लागणार आहे .
पाणीपुरवठा योजना तसेच उन्हाळी (रब्बी) हंगामात धानाचे उत्पादन घेणारा शेतकरी विहीर व बोरवेलच्या माध्यमातून पाण्याचा उपसा करीत असल्यामुळे सातत्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली होती पण पावसाळ्यात नदीनाले, ओढ्यावर बंधारे तयार करून जमिनीत पाणी मुरविण्याचे प्रयत्न केले गेले नाही .त्यामुळे पावसाचे पाणी वाहत गेले .उन्हाळ्याची चाहूल लागताच नदीनाले कोरडे पडले त्यामुळे पाणी पुरवठा योजनाना पर्याप्त पाणी उपलब्ध न झाल्याने ग्रामीणाना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असे. याशिवाय आंघोळीनंतर तसेच भांडी व कपडे धुतल्यानंतर उपयोगात न आलेल्या पाण्याचे योग्य ते नियोजन न करता इतरत्र वाहू दिले जात असल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असल्याचे ग्रामीण भागात चित्र दिसत असे. हे निरुपयोगी पाणी जमिनीत मुरविण्यासाठी १०० टक्के शासकीय अनुदानातून शोषखड्डे तयार करण्याचा महत्त्वकांक्षी उपक्रम राबविण्यात आला. २०२०-२१ व २०२१-२२ ह्या आर्थिक वर्षात लाखनी तालुक्यातील निलागोंदी , सामेवाडा, खैरी ,पिंपळगाव /सडक , धाबेटेकडी, सेलोटी, मानेगाव /सडक , पळसगाव , विहीरगाव ,भूगाव ,झरप ,शिवणी मासलमेटा, सालेभाटा ,सिंधिपार , गडेगाव , आलेसूर इत्यादी गावात ३०७५ शोषखड्डे तयार करण्यात आले. शोषखड्डे तज्ञ जितेंद्र(जीतू) शहारे यांचे कल्पकतेतून स्नानगृहास पाईप जोडून आंघोळ , धुणे व भांडी घासून झालेले निरुपयोगी पाणी शोषखड्ड्यांचे माध्यमातून जमितीन मुरविले जाते. याप्रकाराणे भूगर्भातील पाण्याचे पातळीत वाढ होऊन भविष्यात पाणी टंचाई निर्मूलनाची शक्यता वर्तविली जात आहे.
*एक कुटुंब २३ हजार ६०० लिटर पाणी भूगर्भात मुरवितो(चौकट)*
एका कुटुंबात ४ व्यक्ती असल्यास एक व्यक्ती आंघोळ करणे, कपडे व भांडी धुण्यासाठी प्रती दिवस १५ लिटर पाण्याचा उपयोग करतो . याप्रमाणे प्रती दिवस ६० लिटर , महिन्याचे १८०० लिटर आणि वार्षिक २१हजार ६०० लिटर पाणी शोषखड्ड्यांचे माध्यमातून भूगर्भात मुरवितो अश्या ह्या राष्ट्रीय कार्यास सर्वांनीच सहभाग नोंदविणे आवश्यक आहे.
*प्रतिक्रिया/स्टेटमेंट(चौकट)*
सुरुवातीला शोषखड्डे ओपन असल्यामुळे त्यात माती जाऊन बुजायचे अधिक काळ टिकण्यासाठी शोषखड्ड्यावर प्लास्टिक अंथरूण काँक्रेटिंग केल्यामुळे त्यावर गृहिणी भांडी घासणे व धुणे धुतात त्यामुळे हे निरुपयोगी पाणी शोषखड्ड्यांचे माध्यमातून भूगर्भात मुरून पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते
*जितेंद्र (जीतू) शहारे , शोषखड्डा तज्ञ*
*प्रतिक्रिया/स्टेटमेंट(चौकट)* -
निलागोंदी येथे आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये १७५ शोषखड्डे तयार करण्यात आले. शोषखड्डे तयार करण्याआधी सार्वजनिक विहिरी उन्हाळ्यात कोरड्या पडत असत आता बारमाही पाणी असते.
*वर्षा महावीर वंजारी, सरपंच निलागोंदी*


0 टिप्पण्या