Ticker

6/recent/ticker-posts

लाखनी परिसरात नवीन बिअर बार ला परवानगी देऊ नये


 क्रांतिज्योती महिला संघटनेचे तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :- लाखनी व परिसरात नवीन बिअर बार ला परवानगी देण्यात येऊ नये. दिल्यास महिलांचे वतीने आंदोलनासह आमरण उपोषणाचा इशारा क्रांतिज्योती महिला संघटना व सार्वभौम युवा मंच च्या माध्यमाने अश्विनी भिवगडे यांचे नेतृत्वात तहसीलदार महेश शितोळे यांचे मार्फत जिल्हाधिकरी, उत्पादन शुल्क अधीक्षक, पोलिस अधीक्षक भंडारा तथा उपविभागीय महसूल अधिकारी साकोली यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
          लाखनी आणि परिसरात गेल्या वर्षभरात ६ ते ७ नवीन बिअर बार ला परवानगी देण्यात आली आहे. तर ५ ते ६ बिअर बार चे प्रस्ताव विचाराधीन असल्याचे निवेदनात नमूद आहे. लाखनी ही शिक्षणाचे माहेर घर असल्यामुळे बाहेर गावावरून शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. पण महामार्गालगत दर्शनीय ठिकाणी अनेक बिअर बार आहेत किंवा मंजुरीसाठी प्रस्तावित आहेत. सदर प्रस्ताव स्थानिक महिलांचा विरोध होऊ नये या करिता छुप्या पद्धतीने सादर केल्या जाते. या प्रकाराने भारतीय संविधानाच्या आर्टिकल ४७ नुसार मादक पेय प्रतिबंध घालण्याचे धोरणास केराची टोपली दाखवली गेली आहे. त्यामुळे युवा पिढी अमली पदार्थाचे आहारी गेली असून अनेक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 
             बिअर बार चे नामंजूर प्रस्तावांना उत्पादन शुल्क आयुक्तालयाकडून नियमबाह्य मंजुरी दिली जाते. त्यामुळे २०१२(६) एमएचएलजे ७०८ आणि २०१३(३) एमएचएलजे ४८५ च्या न्यायालयीन आदेशाचे सर्रास उल्लंघन केले जाते. तसेच लाखनी च्या विकास आराखड्यास २२ ऑगस्ट १९८६ अन्वये मंजुरी देण्यात आली असून बिअर बार प्रावधानाचे विपरीत महसूल अधिकाऱ्यांकडून अकृषक वाणिज्य म्हणून परवानगी देऊन अप्रत्यक्ष मदत केली जाते. या प्रकारास आळा बसावा. तथा लाखनी परिसरात नवीन बिअर बार ला परवानगी देण्यात येऊ नये. या करिता संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. त्यावर क्रांतिज्योती महिला संघटनेच्या अध्यक्षा अश्विनी भिवगडे, सार्वभौम युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष दीपक जनबंधू, शीला कांबळे, सरला फुलसुंगे, शुभम खवसकर, नेहाल कांबळे यांचेसह ३१ महिला व पुरुषांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या