गौतम सोनवणे.जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद मो.8308128457,
औरंगाबाद :- पैठण तालुक्यातील डोणगाव ते पारुंडी या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली असून, या रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणारे मटेरियल हलक्या दर्जाचे वापरण्यात येत असल्याने सदर रस्ता व पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी ठेकेदाराला वेळोवेळी सांगूनही ठेकेदार ग्रामस्थांना न जुमानता मनमानी करत असल्याचा आरोप ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अविनाश जाधव, व अशोक राठोड यांनी केला आहे. सदर काम दर्जेदार करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांतून जोर धरू लागली आहे.
डोणगाव ते पारुंडी या रस्त्याच्या व रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी अतिशय हलक्या व निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून थातुरमातुर काम करण्यात येत आहे. पायाभरणी मजबूत न झाल्यास, हा रस्ता व रस्त्यावरील पुल पुन्हा लवकरच उखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काम थातुरमातूर करून पैसे कमविण्याचा गोरखधंदा केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे. हलक्या प्रतीचे मटेरियल वापरून रस्त्याच्या कामाचा दर्जा कितपत टिकणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गुणवत्तेअभावी रस्त्याची लवकरच वाट लागणार असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. परिणामी या कामावरून रस्त्याचे काम करणार्या ठेकेदाराचा केवळ पैसे कमविण्याचा फंडा दिसून येत आहे. मागील बर्याच वर्षानंतर मुहूर्त मिळालेल्या या रस्त्याचे काम अशाच पध्दतीने निकृष्ट केल्यास लवकरच रस्ता उखडून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदरील कामात संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून दर्जेदार काम करून घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
चौकट...............
नसता तीव्र आंदोलन...
सद्यस्थितीत सुरू असलेल्या डोणगाव ते पारुंडी रस्त्याच्या कामासाठी विहीरीवरील खडी वापरली जात आहे. तसेच पुलाच्या कामात अतिशय निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरण्यात येत आहे. यावरून हे काम बोगस होत असल्याचे दिसून येत आहे. हे काम दर्जेदार करावे असे संबधित ठेकेदाराला सांगूनही ठेकेदार मनमानी करत आहे. या कामात सुधारणा करावी नसता आॅल इंडिया बंजारा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अविनाश जाधव, अशोक राठोडसह आदींनी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.


0 टिप्पण्या