मो 9689821132
नांदेड -: जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा संघटक पदी दैनिक सकाळचे हिमायतनगर तालुका बातमीदार प्रकाश जैन यांची निवड करण्यात आली असून परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी प्रकाश जैन यांच्या जिल्हा संघटक पदी नियुक्तीची घोषणा केली आहे .परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी जैन यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .जैन यांची संकटक पदी झालेल्या नियुक्ती बद्दल सर्व पत्रकार व तसेच हिमायतनगर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने व मित्रमंडळींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत .प्रकाश जैन ने गेल्या अडीच दशकापासून पत्रकारितेत योगदान देत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन परिषदेने त्यांची निवड केली आहे. या निवडीबद्दल परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टविकर सरचिटणीस मन्सूर खान, कोषाध्यक्ष विजय जोशी, विभागीय सचिव सचिन शिव शेट्टी माजी पदाधिकारी चारुदत्त चौधरी प्रकाश कांबळे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणे, प्रदीप नागपूरकर आधीचे जैन यांनी आभार मानले आहेत.हिमायतनगर तालुका पत्रकार संघटनेकडून जैन यांची अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले आहेत.


0 टिप्पण्या