कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :- लाखनी येथील तालुका व शहर महिला काँग्रेस कमिटी चे वतीने २७ जानेवारी २०२३ रोज शुक्रवार ला दुपारी १२:०० वाजता कच्छी मेमन हॉल पोलिस स्टेशन जवळ लाखनी येथे हळदी कुंकुचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मंगलाताई नानाभाऊ पटोले, प्रमुख अतिथी महिला काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष जयश्री बोरकर, भंडारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती स्वाती वाघये, जिल्हा परिषद सदस्या डॉ. मनीषा निंबार्ते, सरिता कापसे, विद्या कुंभरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वामिनी तरोने, भाग्यश्री गिलोरकर, लाखनी पंचायत समिती सभापती प्रणाली सार्वे, पंचायत समिती सदस्य योगिता झलके, मनीषा हलमारे, अश्विनी कान्हेकर, माजी सभापती रेखा बांते, रजनी आत्राम, माजी जि. प. सदस्या वंदना पंधरे, बिंदू कोचे, रूपलता जांभुळकर, माजी पंचायत समिती सदस्या सुनंदा बोळने यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने महिलांनी या हळदी कुंकू कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन लाखनी तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष व आयोजक मीनाक्षी धनपाल बोपचे यांनी केले आहे.


0 टिप्पण्या