जळगाव शहरातील आरटीआय कॉलेज मागे इलेक्ट्रिक सबस्टेशन व आयएमआर कॉलेज दरम्यान रस्ता रूंदीकरण चालू आहे.कोण करते,किती मधे करते,नेमके काय करायचे आहे,कोण मक्तेदार आहे,निधी किती दिला आहे,असे कोणतेही बोर्ड या ठिकाणी लावलेले नाही.सब अंधेरेमे धामधूम.खा ले गुपचूप. तेरी भी चूप मेरी भी चूप.
आधीच वीस फुटांचा रस्ता दोन्ही बाजूला तीन फूट कच्चा सोडून तीन फूट खोदला आहे.त्यात खडी, डांबर,कपची वगैरे टाकतील कदाचित.तर मग मधेच दोन फूट का सोडून दिला? पुर्ण रस्ता नाही बनवला तर कच्च्या रस्त्यात पाणी मुरून आजूबाजूची डांबर लूज होईल.पुन्हा हा रस्ता उखडून जाईल.पुन्हा टेंडर, पुन्हा मक्ता, पुन्हा कमीशन.असा हा भ्रष्टाचाराचा प्रवास आहे.मक्तेदार आणि अभियंता एकत्र आले कि,असा हा भ्रष्टाचाराचा जन्म होतो.त्यात भर पडते नगरसेवकांची.म्हणे या भ्रष्टाचाराचे आम्ही सुद्धा काका चुलते मामा भाचे आहोतच.आमदार आणि मंत्री म्हणतात, आम्ही ही नाना नानी दादा दादी आहोतच.
मोदीजी नऊ वर्षांपासून म्हणतात,विकास होगा.पण अजूनही विकासाचा जन्म होतच नाही.होतो फक्त, भ्रष्टाचाराचा जन्म.तक्रार तरी कोणाकडे करणार? केंद्रात भाजप सरकार.राज्यात भाजप सरकार. महानगरपालिकेत भाजप. पालकमंत्री भाजपचे दत्तक पुत्र.नगरसेवक तर कौरवांसारखेच.नक्की कुणाचे?तेच आज स्पष्ट होत नाही.नगरसेवकांच्या निर्मीतीवर कोर्टात खटला चालू आहे.ही कोणाची निर्मीती ?शिवसेनेची कि भाजपची?ठाकरे गटाची कि शिंदे गटाची?
डोके खाजवून खाजवून टक्कल पडायला लागली.पण रस्ते बनवण्याची अक्कल नाही आली.
या अशा कौरवांनी जळगाव चे पुरते हस्तिनापूर बनवले आहे.आणि तिकडे मोदी साहेब, धृतराष्ट्र सारखे डोळे बंद करून बसले आहेत.मला शंका आहे.या राजा महाराजाधिराज धृतराष्ट्र महाराजांना दिसत असावे.त्यांनी मुद्दाम डोळे बंद केलेले असावेत.
मी विनंती करतो, मोदी साहेब डोळे उघडा.बघा,ही तुमची कुरूवंशीय पोरं काय काय नंगानाच करीत आहेत.कधीतरी विचारा , देवेंद्रजींना ,"क्यो भाई,, जलगावमें जो चल रहा है,वो सच है क्या? कभी तो गिरीश भाई को,क्यो भाई,जलगावमे रस्ते की हालत खराब है क्या?कभी तो पुछो जलगावके गांववालोको.क्यो भाई,जलगांवसे जो शिकायत आ रही है,वो सही है क्या?कोई पढा लिखा आयुक्त मिला नही क्या?कोई पढालिखा अभियंता मिला नहीं क्या?कोई ईमानदार नगरसेवक या आमदार चुना नहीं क्या?
मोदीजी,आप कितना भी मेहनत करो,ऐसे लोगो को बगल में लेकर विकास पैदा नहीं होगा.सिर्फ होगा भ्रष्टाचार और भकास! आईये जलगांवमे.देखिये.कितना विकास हुआ है और कितना भकास हुआ है?मगर,ये देखने के लिये आंखे भी खुली हो, और दिलभी!
.... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.


0 टिप्पण्या