Ticker

6/recent/ticker-posts

लाकडी दांड्याने डोक्यावर मारून केले जखमीपोहरा येथील घटनालाखनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :- कोंडा खरेदी विक्री करण्याचे कारणावरून झालेल्या भांडणात डोक्यावर लाकडी दांड्याने मारहाण करून जावेद छव्वारे यास गंभीर जखमी केल्याप्रकरणी लाखनी पोलिसांनी आसिफ यासिन आकबानी (२५) , यामिन यासिन आकबानी(३०) ,यासिन गफ्फार आकबानी(५५),एहसान यासिन आकबानी(२१) सर्व राहणार पोहरा यांचेवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे. 
   कोंडा खरेदी विक्री केल्याचे कारणावरून यातील आरोपीतांनी संगनमत करुन शादाब छव्वारे,जावेद छव्वारे ,इमरान छव्वारे,सोहेल छव्वारे यांचेशी बाचाबाची करून ढकलढुकल केले व लाताबुक्क्यांनी मारहाण करून यामीन आकबानी याने जावेद छव्वारे याचे डोक्यावर लाकडी दांड्याने वार करून गंभीर जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने शादाब छव्वारे याचे फिर्यादीवरून तथा वैद्यकीय अहवालावरून आकबानी परिवारातील ४ व्यक्तींवर अपराध क्रमांक १३/२०२३ नुसार गुन्हा दाखल केला असून कलम ३२६,३२३,५०४,५०६,३४ भादवी अन्वये पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी तपास करीत आहेत. आरोपींना अटक करून प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी लाखनी यांचे समक्ष उपस्थित करण्यात आले असता न्यायालयाने आरोपीतांना जामीन मंजूर केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या