Ticker

6/recent/ticker-posts

जामखेड शहरात संविधान महोत्सव उत्साहात साजरा

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :-  सालाबादाप्रमाणे जामखेड शहरात प्रजासत्ताक दिनादिवशी संविधान_महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन असते महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारत देशाला स्वःलिखित संविधान अर्पण केले आहे..
त्या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी झाली व देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला नागरिकत्वाचा अधिकार मिळाला त्यामुळे संविधानाची जनजागृती करण्यासाठी जामखेड शहरात नऊ वर्षांपासून समस्त भिमसैनिक जामखेड तालुका यांच्या वतीने संविधान महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात येतो याही वर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मोटारसायकल रॅली,महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक साजन बेंद्रे व विशाल चव्हाण यांचा भिम विचारांचा क्रांतिकारी जलसा पार पडला त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले...
महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला माजी मंत्री आमदार प्रा.राम शिंदे साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
कार्यक्रमाचे संपुर्ण आयोजन सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांनी केले ...
वैद्यकीय क्षेत्रात डाॅ.फारुक शेख,पत्रकारिता क्षेत्रात नासीरभाई पठाण,सामाजिक क्षेत्रात अमित गंभीर,शैक्षणिक क्षेत्रात मुकुंद राऊत,समता सैनिक पंडीत मोरे या मान्यवरांना संविधान महोत्सव 2023 पुरस्कार देऊन गौरविण्यात आले..
कार्यक्रमात आमदार प्रा.राम शिंदे साहेब यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा.मधुकर राळेभात,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे,वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक अँड अरुण जाधव,प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात,भाजपाचे सलीमभाई बागवान,नगरसेवक अमित चिंतामणी,अँड.प्रमोद राऊत,अँड प्रविण सानप,प्रकाश काळे,नगरसेवक मोहन पवार,भिमटोला ग्रुपचे बापूसाहेब गायकवाड, संचालक सागर सदाफुले,बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड,सुनील जावळे,राजेंद्र सदाफुले,मुकुंद घायतडक, सुकेंद्र सदाफुले,विनोद घायतडक, प्रा.राहुल आहेर,अतिश पारवे,अनिल सदाफुले,रतन सदाफुले भारतीय बौद्ध महासभेचे सौ.सुरेखा सदाफुले,मालनबाई घायतडक,अरुणा सदाफुले, यांच्या सह हजारोंच्या संख्येने आंबेडकरी समाजातील पुरुष व महिला उपस्थित होत्या..
कार्यक्रम यशस्वीसाठी सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांच्या सह नगराध्यक्ष निखिल घायतडक,राजन समिंदर सर, दादासाहेब घायतडक, रवी सोनवणे,सनी प्रिन्स सदाफुले,प्रमोद सदाफुले,सचिन आण्णा सदाफुले, सोनू सदाफुले,राकेश घायतडक, किशोर काबंळे,अक्षय घायतडक, मनीष घायतडक, अक्षय गायकवाड, विकीभाई गायकवाड,प्रतिक निकाळजे,रोहित राजगुरु,संतोष थोरात,अजित घायतडक,अतिश डाडर, तुषार डाडर,रोहित सदाफुले,हर्षवर्धन घायतडक,अशोक सदाफुले,मिलिंद भोसले,अमोल गव्हाळे,विकी आहेर यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या