Ticker

6/recent/ticker-posts

शिकारीचे प्रयत्नात असणाऱ्या इसमांना वन कर्मचाऱ्यांनी पकडले

वनरक्षक बीट चान्ना-१ मधील प्रकार

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा:- वन परिक्षेत्र अड्याळ चे अधिनस्त असलेल्या वनरक्षक बीट चान्ना-१, तालुका लाखनी येथील राखीव वन कक्ष क्रमांक २९१ मध्ये लोखंडी ताराच्या साहाय्याने अवैध रित्या वन्य प्राण्यांच्या शिकारीचे प्रतीक्षेत असलेल्यांना वन कर्मचाऱ्यांनी रविवारी(ता.२२) सायंकाळचे सुमारास एकास पकडले. तर दोन इसम पळून जाण्यात यशस्वी ठरले. वन कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव संदीप पुरुषोत्तम कुरसुंगे(२९) रा. खुर्शीपार/बांध असे आहे. 
           वन परिक्षेत्र अड्याळ चे अधिनस्त माडगी(पूर्व) क्षेत्र सहाय्यक विनोद पंचभाई, वनरक्षक विजय राऊत, विपीन डोंगरे, प्रमोद मस्के, आकाश कवाडे रोपवन मजुरांसह सामूहिक बीट पेट्रोलिंग करीत असताना वनरक्षक बीट चान्ना क्रमांक १ मधील कक्ष क्रमांक २९१ चे राखीव वनक्षेत्रात अवैधरित्या ४३१ मीटर बांबूच्या खुंट्या गाडून लोखंडी जीआय तार लांबवून ठेवल्याचे निदर्शनास आले. तार लांबवून ठेवणारे इसम येतीलच या करिता वन कर्मचारी दबा धरून बसले होते. सायंकाळी ५:१५ वाजता दरम्यान काही संशयित इसम लंबविलेले तार विजेच्या जिवंत तारांना जोडण्याचा प्रयत्न करीत असता वन कर्मचाऱ्यांची चाहूल लागताच मोक्यावरून पळून जाताना दिसून आले. वन कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून संदीप पुरुषोत्तम कुलसुंगे(२९) रा. खुर्शीपार/बांध, तालुका लाखनी यांना पकडले. तर भाऊराव रामचंद कुलसुंगे आणि डूलीचंद सरदार किन्हाके दोघेही रा. खुर्शीपार हे दोघेही पळून जाण्यास यशस्वी ठरले. दुसऱ्या दिवशी डूलीचंद किन्हाके वन अधिकाऱ्यांना शरण आला. भाऊराव कुलसुंगे ह्या फरार इसमाचा शोध सुरू आहे. उपवनसंरक्षक राहुल गवई, सहाय्यक वनसंरक्षक(वन्यजीव व रोहयो) यशवंत नागुलवार यांचे मार्गदर्शनात वन परिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे, परिविक्षाधिन वन परिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या