Ticker

6/recent/ticker-posts

ट्रक अपघातात चालक ठार क्लिनर जखमी मुंडीपार/ सडक येथील घटना

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

लाखनी पोलिसात गुन्ह्याची नोंद

 भंडारा लाखनी : - समोर जाणाऱ्या ट्रकला मागेहून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने चालक गंभीर जखमी झाला होता .उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तर क्लिनर जखमी झाल्याची घटना मुंडीपार / सडक येथे शनिवारी (ता ४) मध्यरात्री २वाजता दरम्यान घडली मृतक चालकाचे नाव विशाली कुमार रा.नालंदा ( बिहार) तर जखमी क्लिनर चे नाव रजनीश कुमार अशोक कुमार प्रसाद (१८) रा. राजगिर जिल्हा नालंदा( बिहार) असे आहे. लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
        फिर्यादी रजनीश कुमार याला स्वगावी जायचे असल्याने त्याने इंग्लंड वल्डे लाजेस्टिक कंपनीच्या ट्रक क्रमांक एनएल ०१ क्यू ५१६४ चा चालक विशाली कुमार ला फोन करून त्याचे सोबत ट्रक ने गावाकडे जाण्यास निघाला असता मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास समोर जाणाऱ्या ट्रकला मागेहुन धडक दिल्याने चालक विशाली कुमार व क्लिनर रजनीश कुमार जखमी झाले होते . जखमी अवस्थेत क्लिनर ने जवळच्या धाब्यावर जाऊन मदत मागितली असता ढाबा मालकाने पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे भ्रमणध्वनीवर अपघाताची माहिती दिली. क्षणाचाही विलंब न लावता ते , पोलिस उपनिरीक्षक अमोल तांबे , पोलिस नायक प्रकाश न्यामुर्ते , संदीप मेश्राम व चालक मंगेश चाचेरे ह्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले असता ट्रक चालक केबिन मध्ये फसल्याचे दिसून आले महामार्गावरून जाणाऱ्या वाहनास थांबवून त्याचेकडील दोराचे साहाय्याने केबिन वाकवून गंभीर जखमी चालकास बाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविण्यात आले . प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठविण्यात आले . उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला . क्लिनर रजनीश कुमार याचे फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक ३७/२०२३ नुसार भरधाव वेगाने व लापरवाहिने वाहन चालवून स्वतःचे मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला  आहे कलम २७९ ,२३७,२३८, ३०४(अ) भादवी तथा मोटार वाहन कायदा सहकलम १८४ अन्वये पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार निलेश रामटेके तपास करीत आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या