लाखनी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
भंडारा लाखनी -: मानसिक आजाराला कंटाळून युवकाने घरातील बेडरूमचे हुकाला स्वतःचे दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी ( ता २) रात्रीचे सुमारास उघडकीस आली . मृतकाचे नाव राजेश हरिदास गायधने (३२) रा.आदर्श नगर लाखनी असे आहे . लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
सदन शेतकरी कुटुंबातील राजेश मनोरुग्ण असल्यामुळे कुटुंबीयांसोबत वास्तव्यास होता . त्याने मानसिक आजारास कंटाळून राहते घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती होताच लाखनी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली .पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात सहायक फौजदार देविदास बागडे घटनास्थळी दाखल झाले. कुटुंबीयांचे मदतीने मृतदेह खाली उतरवून सर्व सोपास्कार पार पाडले .तथा उत्तरीय परिक्षणासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविण्यात आला . मृतकाचा भाऊ मयूर गायधने (२९) याचे फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. शव परिक्षणानंतर मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला .स्थानिक स्मशानभूमीत त्याचेवर अत्यसंस्कार करण्यात आले . कलम १७४सीआरपीसी नुसार पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात सहायक फौजदार देविदास बागडे तपास करीत आहेत.
0 टिप्पण्या