🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२३ - १ जून
शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत २०७९
भा. रा. ११ ज्येष्ठ १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : उत्तरायण
ऋतू : ग्रीष्म
मास : ज्येष्ठ
पक्ष : शुक्ल
तिथी : द्वादशी (१३.४०) ~ त्रयोदशी
वार : गुरूवार
नक्षत्र : चित्रा (०६.४०) ~ स्वाती
राशी : तुला
*गुरू प्रदोष*
चंपक द्वादशी
*धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती* (तिथीनुसार)
जागतिक दूध दिन
जागतिक पालक दिन
१८३१: सर जेम्स रॉस यांनी पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर ध्रुवाचे स्थान निश्चित केले.
१८७४: स्वातंत्र्य पूर्व भारतातील ब्रिटीश सरकारची इस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आली.
१९२९: विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम व केशवराव धायबर यांनी प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना केली.
१९३०: मुंबई व पुणे दरम्यान दख्खनची राणी (Deccan Queen) ही रेल्वेगाडी सुरू झाली.
१९४५: टाटा मूलभूत संशोधन संस्थेची (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) स्थापना झाली.
१९६१: अमेरिकेतील फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) ला जगात सर्वप्रथम स्टिरीओ एफ. एम. प्रसारणासाठी परवानगी मिळाली.
२००१: नेपाळचे राजे वीरेंद्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह अकरा जणांची युवराज दीपेंद्र यांनी निर्घृण हत्या केली.
२००३: चीन मधील महाप्रचंड थ्री गॉर्जेस धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली.
२००७: ब्रिटनमध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली.
२०१४: नायजेरियातील फुटबॉल खेळाच्या मैदानात झालेल्या बॉम्बस्फोटा मध्ये ४० लोकांचा मृत्यू.
जन्मदिवस
१८४२: पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर
१८४३: फिंगरप्रिंटिंग चे जनक हेन्री फॉल्स
१८७२: नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी बी
१९०७: जेट इंजिन विकसित करणारे फ्रँक व्हाईट
१९२६: अमेरिकन अभिनेत्री मेरिलीन मन्रो
१९२९: हिन्दी चित्रपट अभिनेत्री फातिमा रशिद ऊर्फ नर्गिस दत्त
१९७०: आर. माधवन, हिंदी चित्रपट अभिनेता.
१९७५: भारतीय सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार तसंच, पद्मश्री पुरस्कार सन्मानित पहिल्या भारतीय ऑलिम्पिक पदक विजेता भारतीय भारतोलन खेळाडू कर्णम मल्लेश्वरी.
१९८५: भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक.
१९९१: भारतीय युवा महिला क्रिकेटपटू राजेश्वरी गायकवाड
मृत्यूदिन
१८३०: भारतीय धार्मिक गुरू स्वामीनारायण
१९३४: प्रसिद्ध नाटककार आणी विनोदी लेखक श्रीपादकृष्ण कोल्हटकर
१९४४: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर
" १९६२: दुसर्या महायुद्धात शेकडो ज्यू लोकांची कत्तल करणार्या अॅडॉल्फ आइकमॅन या जर्मन सेनापतीला इस्त्रायलमधे फाशी देण्यात आले.
१९६८: अंध मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती आणि समाजसेविका हेलन केलर
१९८४: हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते नाना पळशीकर
१९८७: दिग्दर्शक, पटकथाकार आणि लेखक के.ए. अब्बास
१९९८: ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर
१९९९: होव्हर्क्राफ्ट चे निर्माते शोधक ख्रिस्तोफर कॉकेरेल
२००६: लोकसत्ता देनिकाचे माजी संपादक आणि पत्रकार माधव गडकरी
*।। दास-वाणी ।।*
अव्हा शंख अव्हावेल ।
गुप्त वनस्पती अमोल ।
येरंड धोत्रे बहुसाल ।
प्रगट सिंपी ।।
कोठे दिसेना कल्पतरू ।
उदंड सेराचा विस्तारू ।
पाहातां नाहीं मळियागरू ।
बोरि बाभळा उदंडी ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०६/०९/१२-१३
उजवा शंख आणि उजव्या बाजूने वर चढत जाणारी वेल जशी दुर्मिळ आहे तितकीच प्राण वाचविणारी संजीवनीसारखी वनस्पतीही दुर्मिळच आहे. एरंडी, धोतरा या वनस्पती आणि शिंपल्या मात्र इकडे तिकडे पसरलेल्या दिसतात.
कल्पतरू कुठेच दिसत नाही, शेराची झाडे मात्र रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड संख्येने आढळतात.
मलयपर्वतावरच आढळणारे चंदन सहसा इतरत्र पहायला मिळत नाही परंतु बोरी बाभळी मात्र जागोजागी दिसतात.
निकृष्ट असार गोष्टी सर्वत्र मोठया प्रमाणात उपलब्ध असतात. उत्कृष्ठ सार जे ग्राह्य ते मात्र दुर्मिळ दुर्लभ असते. फक्त जाणकारच ते शोधतात आणि भोगतात. हे सारशोधन ज्यांना सहज जमते त्यांनाच देवशोधनही घडते. तेच साधू , संत आणि सत्पुरूष !
सारशोधन समास.
🙏 💐 💐 💐 💐 💐 🙏


0 टिप्पण्या