Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞‌






💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌इसवी सन २०२३ - २९ मे
‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०७९
‌भा. रा. ८ ज्येष्ठ १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : उत्तरायण 
ऋतू :   ग्रीष्म 
मास :  ज्येष्ठ
पक्ष :   शुक्ल             
‌तिथी :  नवमी (११.५०) ~ दशमी                               
वार :    सोमवार
नक्षत्र :  उत्तरा         
राशी :   सिंह (०८.५०) ~ कन्या 

*महेश नवमी*

*गुरूदेव रानडे पुण्यतिथी*
*सद् गुरू वामनराव पै पुण्यस्मरण*

जागतिक पचन स्वास्थ्य दिन
संयुक्त राष्ट्र शांतिसैनिक दिन

१९१४: ओशियन लाइनर आर.एम.एस. इंप्रेस ऑफ आयर्लंड जहाज बुडून त्यात १९९२ लोक ठार झाले.
१९१९: अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची चाचणी घेण्यात आली.
१९५३- उत्तुंग अशा एव्हरेस्ट शिखरावर शेर्पा तेनसिंग याने ब्रिटिश गिर्यारोहकांबरोबर चढाई करुन ११.३० वाजता पहिले पाउल ठेवले.
१९८५: पाय नसलेल्या स्टीव फोन्योने व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया येथे मॅरेथॉन शर्यत पूर्ण केली. ४२ कि.मी. अंतर पार करण्यास फॉन्योला चार महिने लागले.
१९९९: स्पेस शटल डिस्कव्हरी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला जोडले गेले.
२००७: जपानची महिला रियो मोरी हीने विश्वसुंदरी चा किताब पटकाविला.
२००८: भारतीय जनता पक्षाचे नेते वी. एस. यदुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
२०१०: भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी  हेनान प्रांतातील लुओयांग येथे पहिल्या शतकातील प्राचीन श्वेताश्व व्हाईट हॉर्स मंदिर संकुलात भारतीय शैलीतील बौद्ध मंदिराचे उद्घाटन केले.
२०१९: ट्रांसजेंडर हे मानसोपचार आजाराच्या यादीतून जागतिक आरोग्य संघटनेने काढून टाकले.

जन्मदिवस 
१८६५: कलकत्ता शहरावर आधारित मासिक पुस्तिका मॉडर्न रिव्ह्यूचे संस्थापक व संपादक तसंच हिंदू महासभेचे नेते, स्वातंत्र्य सेनानी रामानंद चटर्जी.
१९०५: भारतीय संगीत क्षेत्रातील अध्वर्यू गानहिरा हिराबाई बडोदेकर
१९१४: एव्हरेस्टवीर शेर्पा तेनसिंग नोर्गे 
१९१७: अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी
१९४७: परम विशिष्ट सेवापदक व शौर्य चक्र पुरस्कार सन्मानित भारतीय वायुसेना दलाचे माजी वायुसेना दल प्रमुख एअर चीफ मार्शल फली होमी मेजर.

मृत्यूदिन 
१८२९: विद्युत पृथक्‍करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ सर , हंफ्रे डेव्ही 
१८९२: बहाई पंथाचे संस्थापक बहाउल्ला 
१९३३: भारतीय स्वातंत्र्य सेनानी, पत्रकार आणि संघटक लोकराम नयनराम शर्मा. 
१९७२: अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर 
१९७७:भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक, सुनीतिकुमार चटर्जी. 
१९८७: भारताचे ५ वे पंतप्रधान, किसान नेते चौधरी चरणसिंग 
२००७: प्रसिद्ध हिंदी व मराठी संगीतकार स्‍नेहल भाटकर.
२०१०: समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक ग. प्र. प्रधान 
२०२०: अजित जोगी, छत्तीसगढचे पहिले मुख्यमंत्री.

*।। दास-वाणी ।।* 

ऐका अज्ञानाचें मत । 
सृष्टी आहे ते शाश्वत । 
देव धर्म तीर्थ व्रत । 
सत्यचि आहे  ।। 

बोले सर्वज्ञाचा राजा । 
मूर्खस्य प्रतिमापूजा । 
ब्रह्मबळयाच्या पैजा । 
घालूं पाहे  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०६/०६/०८-०९ 

सृष्टीमधे असंख्य विविधता असलेले ज्ञानी आणि अज्ञानी जीव आहेत. त्यामुळे सृष्टी सत्य की मिथ्या याविषयी असंख्य मतमतांतरे आहेत. अज्ञानी सामान्य जनांचे मत हे की ही दृश्य सृष्टी सत्य आणि शाश्वत आहे. मूर्तीरूप देव, त्यासाठी त्याच्या नावाने केलेला दानधर्म, देव दर्शनासाठी अपार कष्ट सोसून केलेल्या तीर्थयात्रा तसेच उपासनेमधे केलेली व्रतवैकल्ये ही देखील निश्चितच अपेक्षित फल देणारी आहेत. ईश्वर आपल्यावर प्रसन्न होऊन कृपा करेलच.

मात्र सर्वश्रेष्ठ ज्ञानी म्हणतो मूर्ती आणि प्रतिमांचे पूजन करणे फक्त मूर्खाचेच काम. ज्या दैवतांचे आपण पूजन करतो ते सर्व देव ब्रह्मदेवाच्या प्रलयकाळी नष्ट होणारे असतात. हे मी पैजेवर सांगतो.

सगुणाचे उपासक मूर्तीपूजेला प्राधान्य देतात. तर निर्गुण निराकाराचे उपासक परब्रह्माच्या ठायी आत्मनिवेदन हाच मोक्ष मानतात.

सृष्टीकथन समास.

🙏 💐 💐 💐 💐 💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या