प्रतिनिधी चित्रा न्युज
अमरावती :-संभाजी ब्रिगेड शाखा तळेगाव दशासर तर्फे आज दि.26.05.2023 निवेदन देण्यात आले त्यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष अजय भाऊ हटवार शाखा अध्यक्ष सुयोग भाऊ ठाकरे व सागर भाऊ बाबरे मिलिंद भाऊ अवचत व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
मानानिय सरपंच सचिव ग्रामपंचायत कार्यालय आपल्या सेवेशी सविनय निवेदन सादर करतो आहे कि, आपल्या माहितीस आपल्या गावात जिल्हा परिषद शाळा आहे त्या मध्ये वर्ग इयत्ता ५ ते १२ पर्यंत आहे पण त्या मध्ये उच्च शिक्षणासाठी वर्ग ११ वी आणि १२ वी कला शाखा च गावामध्ये आहे परंतु मुलांचा विज्ञानाचा कल बघता त्या शिक्षणासाठी गावातील विद्यार्थ्यांना गावाच्या बाहेर जाऊन उच्च शिक्षणाचा पाया भरावा लागतो त्या मध्ये विज्ञान शाखा वाणिज्य शाखा या सारख्या या मध्ये विद्यार्थांचे उज्वल भविष्य सावरण्यासाठी याचा खुप मोठा वाटा मदतीस असतो.
करिता महोदय आपणास आमची आग्रहाची विनंती आहे कि वर दिल्या प्रमाणे विज्ञान आणि वाणिज्य ( SCIENCE AND COMMARCE ) शाखा आपल्या गावामध्ये असणे आवश्यक आहे आपल्या गावातील लोकसंख्या व शिकत असलेले विद्यार्थी आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढत असेलेली बेरोजगारी या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपल्या गावात या शाखा असल्यास याचा खुप मोठा फायदा मुलां मुलीच्या भविष्य सावरण्यासाठी मदत होईल याची आपण दखल घ्यावी.


0 टिप्पण्या