लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड मो. 9689821132
नांदेड :-हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथे परमपूज्य बालयोगी सद्गुरु व्यंकट स्वामी जी महाराज दत्त संस्थान पिंपळगाव यांच्या हस्ते हनुमान मंदिरासमोर 50 बाय 50 च्या शेडचे भूमिपूजन 24 मे रोजी सकाळी सात वाजता करण्यात आले . करंजी येथील ग्रामस्थांनी या कामी दाखविलेल्या एकजुटीचे कौतुक केले गावकऱ्यांनी शेड उभारणीचा घेतलेला निर्णय शेड उभारून पूर्णत्वास होणारच असा संत स्वरूपी आशीर्वाद दिला ज्या व्यक्तीने यासाठी सुरुवात केली त्या व्यक्तीचे कौतुक केले . भूमिपूजन प्रसंगी दशरथ वाघमारे रंगराव जाधव केशवराव प्रभणकर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रंगराव पाटील जाधव राऊत पठाण सुभाष माने बालाजी पाटील मानकरी राजेश्वर पवार भुजंगराव जाधव विनोद पवार बालाजी सूर्यवंशी ज्ञानेश्वर पट्टेवार अंकुश मिराशे विनायक सूर्यवंशी बाबाराव पाटील धोंडगे श्याम कदम उमेश कदम परमेश्वर सूर्यवंशी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.


0 टिप्पण्या