जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यवाहीचे आदेश !
प्रतिनिधी चित्रा न्युज
नागपूर : जिल्ह्यातील मौदा तालुक्यामधे अवैध सावकारीचे प्रकरण समोर आले आहे. जिथे आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या गरजू शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्या नावावर त्यांच्या शेतजमीनीवर अवैध कब्जा करण्याचे प्रकार लक्षात येताच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार पक्षाचे महानगर अध्यक्ष रवी शेंडे व जिल्हाध्यक्ष दिपक दुपारे यांच्या नेतृत्वात आज नागपूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
मौदा तालूक्यातील अनेक शेतकऱ्यांनी एक व्यक्तीकडून आर्थिक कर्ज दरमहा व्याजानुसार घेतलेले होते. त्या मोबदल्यात गहाण म्हणून शेतकऱ्यांच्या शेतजमिनींची रजिस्ट्रीच संबंधित व्यक्तीने स्वतःच्या व घरातील इतर व्यक्तींच्या नावावर लावून घेतल्यात. कर्जाची एकूण रक्कम व्याजासहित परत केल्यानंतर सर्व शेतजमिनी पुर्ववत शेतकऱ्यांना रजिस्ट्री करून देण्याचे आश्वासन कथित अवैध सावकाराने दिले होते. परंतू संपुर्ण कर्ज रक्कम व्याजासहित परत केल्यावरही कथित सावकाराने शेतजमीनीचा ताबा शेतकऱ्यांना दिला नाही. करिता अशाप्रकारे अवैध सावकारीच्या माध्यमातून शेतजमिनीचे खरे मालक असलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या शेतजमीनी बळकावण्यात आल्या.
पिडित शेतकऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेवून सर्व प्रकार निदर्शनात आणून दिला. तेव्हा यावर तात्काळ कार्यवाही करत जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करण्याचे आदेश त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिलेत. त्यानुसार आज पक्षाचे प्रतिनिधिमंडल व पिडित शेतकरी यांनी नागपूर चे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी चे आदेश दिलेत.
यावेळी शहर अध्यक्ष रवीभाऊ शेंडे, नागपूर पूर्व चे जिल्हाध्यक्ष दिपक दुपारे, राहूल दहिकर, धर्मेश फुसाटे, सिध्दांत पाटील, सोनिया डोंगरे, धम्मदिप लोखंडे, यश कुंभारे, रमेश कांबळे, विजय गोंडुले, धर्मपाल लामसोंगे, राहुल भिमटे, मंथन गजभिये, अजय कोचे, इ. पदाधिकारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या