लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड मो 9689821132
नांदेड:- सामाजिक कार्यकर्ते प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे मराठवाडा अध्यक्ष , दैनिक विष्णुपुरी एक्सप्रेसचे संपादक तथा लोकतंत्र न्युजचे मुख्य संपादक मा.ना.झेंपलवाड यांना इंटरनॅशनल अचिव्हर्स अवॉर्ड व पुरस्कार प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मा.ना.झेंपलवाड विद्यार्थी दशेपासून सातत्य पुर्ण विविध सामाजिक उपक्रमाव्दारे सामाजिक बांधिलकी जपत असतात.त्यांचा विविध सामाजिक ,शैक्षणिक, क्रिडा, कृषि, सांस्कृतीक, इत्यादि विविध सातत्यपूर्ण उपक्रमात अग्रगण्य सहभाग नोंदवत असतात. सामाजिक व पत्रकारिता क्षेत्राच्या माध्यमातुन नांदेड जिल्हासहीत मराठवाड्यात एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
तसेच त्यांच्या संघटनात्मक कौशल्य, कल्पक सामाजिक कार्याच्या माध्यमातून विविध कार्यक्षेत्रात महाराष्ट्र भर मोठा जनसंपर्क निर्माण केला आहे.
सदरील कार्यक्रम हा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या - IHRC यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दिमाखात पार पडला.
या कार्यक्रमात सुमारे 160 उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ते , डॉक्टर , पत्रकार ,संपादक, पोलीस अधिकारी , प्राध्यापक , रेल्वे व्यवस्थापक,कर्मचारी , महाराष्ट्र राज्य परिवहन परिवहन महामंडळाचे अधिकारी कर्मचारी,
जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विविध शासकिय अधिकारी कर्मचारी, विधी शाखेचे कायद्याचे गुणवंत विद्यार्थी यांना कार्यक्रमाच्या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इंटरनॅशनल अचिव्हर्स अवॉर्ड व पुरस्कार प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमास विशेष प्रमुख पाहुणे दिवाणी न्यायालय नांदेड वरिष्ठ विभाग नांदेडचे जिल्हा न्यायधीश श्रीमती.दलजित कौर मॅडम, श्री.कृष्णा कोकाटे आयपीएस, एसपी नांदेड , श्री.अभिनाश कुमार आयपीएस, अतिरिक्त एसपी नांदेड , शांतीदूत परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष त्रुशिला जाधव , कार्यक्रमाचे प्रायोजक आणि प्रमुख पाहुणे कुंदन पत्रावली आणि कमल नलगे पत्रावली व नांदेड टुडेचे श्री.इकबाल अली, सह: संपादक अॅड. आसिफ खान , ब्रँड मॅनेजमेंटचे संचालक वसीम बाबू महाराष्ट्र राज्य कायदेशीर सल्लागार IHRC.
श्री नईम खान सलीम खान उपरोक्त मान्यवराच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास बहुसंख्य समाजसेवक, पत्रकार, संपादक, शासकिय अधिकारी,कर्मचारी मान्यवर उपस्थित होते.


0 टिप्पण्या