कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा :- पावसाळ्याला केव्हाही सुरुवात होऊ शकते. त्या अगोदर गावातील सांडपाणी वाहून जाणारी खुली गटारे सफाईस ग्रामपंचायतीचे वतीने प्रारंभ झाले आहे. स्वच्छ केलेल्या गटारांच्या बाजूला काही दिवस उपसलेला मलबा राहून नागरिकांची गैरसोय होणार आहे. तरीही जनतेने ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच शरद इटवले यांनी केले आहे.
दिघोरी येथील लोकसंख्या १४०१ असून गावात सर्व जाती धर्माच्या लोकांचे वास्तव्य आहे. गावात अत्यल्प शेतकरी व भूमिहीन शेतमजुरांचा भरण अधिक आहे. सांडपाण्याची व्यवस्था व्हावी. याकरिता गावात असलेल्या सर्वच रस्त्याच्या दोन्ही बाजूला सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारे आहेत. त्यातील काही खुली तर काही बंदिस्त आहेत. ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे वेळोवेळी गटारांची सफाई केली जात नाही. पण पावसाळ्यात नाल्यांमध्ये पाणी साचू नये व गावात आजाराची साथ पसरू नये. या करिता पावसाळा सुरू होण्यापूर्वी ग्रामपंचायतीचे वतीने गटारे सफाईस प्रारंभ करण्यात आलेला आहे. सफाई केलेल्या नालीतून निघणारा मलबा ओला असल्यामुळे नालीचे बाजूला वाळेपर्यंत ठेवलेला असतो. त्यामुळे रहदारीस अडचण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. असे सरपंच शरद इटवले यांनी आवाहन केले आहे.
गाव आणि परिसरात स्वच्छता राहावी. या करिता ग्रामपंचायतीचे वतीने प्रत्येक कुटुंबाला कचरा पेटी उपलब्ध केली होती. पण काही कुटुंब घरात निघणारा केर कचरा कचरा पेटीत साठवून खातकुड्यात न नेता घरासमोरून जाणाऱ्या गटारात टाकला जातो. त्यामुळे सांडपाणी वाहून जात नाही. परिणामी डासांची पैदास होऊन गावाचे आरोग्य बिघडण्याचे मार्गावर असल्याने गृहिणींनी कचरापेटी चा वापर करण्याचे आवाहन सरपंच शरद इटवले यांनी केले आहे.
प्रतिक्रिया
पावसाळ्यात अस्वच्छतेमुळे साथीचे रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट व्हावी. या करिता ग्रामपंचायतीचे वतीने पावसाळ्याआधी गावातील गटारे सफाईला सुरुवात केली आहे.
शरद इटवले, सरपंच, ग्रा. प. दिघोरी


0 टिप्पण्या