Ticker

6/recent/ticker-posts

दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करून अशपाकला न्याय द्या - वंचित बहुजन आघाडी

चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.8888117975

 जळगाव:- अमळनेर मध्ये दोन गटात झालेल्या तुफान दगडफेकीत पोलिसांनी जवळ जवळ ७० ते ८० लोकांवर गुन्हा नोंदवला आहे. त्यापैकी ३२ संशयित गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. यापैकी नगरसेवक सलीम टोपी यांचा मुलगा संशयित आरोपी अशपाक याचा कारागृहात असताना मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूसह दंगलीची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करून यात दोषी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करावे, मृत अशपाक याच्या वारसास सरकारी सेवेत रुजू करावे, मयताच्या कुटुंबाला ५० लक्ष रुपये शासनामार्फत मदत म्हणून द्यावी, निरपराध असलेल्या संशयित आरोपींवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे, घटनास्थळी असणारे खरे दंगलखोर आणि सीसीटिव्ही फुटेज मध्ये निदर्शनास आलेले विकृत मानसिकतेतील दंगल घडविणारे यांना तात्काळ अटक करून निरपराध नागरिकांवरील आरोप मागे घेऊन त्यांची त्वरित सुटका करावी, अश्या आशयाचे निवेदन विशेष पोलिस महानिरिक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक बी.जी. शेखर पाटील यांना झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आले.

यावेळी  वंचित बहुजन आघाडी जिल्हा प्रभारी रविकांत वाघ, जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे,अमळनेर तालुका अध्यक्ष दाजीबा गव्हाणे, जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद शफि,जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग,जिल्हा संघटक शेख याकुब शेख नजीर,मेजर देवदत्त मकासरे,शरीफ खान,अमळनेर शहर अध्यक्ष संदीप सैदांने, शेख पूनमचंद निकम,भीमराव वानखेडे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या