• मानेगाव/सडक येथील घटना
• ५ इसमाविरुद्ध गुन्हा दाखल
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा :-लाखनी येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मानेगाव/सडक येथे उपविभागीय पोलिस अधिकारी साकोली यांचे पथकाने गुप्त माहिती वरून मिळालेल्या ठिकाणी छापा मारला असता धनराज समरीत याचे पानठेल्याचे मागे बसून ताश पत्त्यावर पैशाचे हारजीत चा खेळ खेळताना मिळून आल्याने ५ इसमांना ताब्यात घेण्यात आले असून त्याचेकडून २९ हजार ९८० रुपयाचा माल जप्त करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची नावे सुरेश खेमराज नेवारे(५४), राजेंद्र जगन आगरे(४८), नितेश कोठीराम रोडके(३४), हितेश केवळराम मनगटे(२६), धनराज पिसाराम समरीत(४५) सर्व राहणार मानेगाव/सडक अशी आहेत. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत सिंह त्यांचे पथकातील पोलिस हवालदार कुंभरे, पोलिस अमलदार कुळमते, लाखनी चे पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी व पोलिस अमलदार सुनील मेश्राम यांचेसह शुक्रवारी(ता.२३) सायंकाळी ६ ते ६:३० वाजताचे दरम्यान खाजगी चार चाकी गाडीने गुप्त माहितीच्या आधारे मानेगाव/सडक येथील धनराज समरीत यांचे पानठेल्यामागे असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड मारले असता ५ इसम बावन पत्तीच्या ताशावर पैशाच्या हारजीत चे खेळ खेळत असल्याचे मिळून आल्याने त्यांचेकडून २२ हजार रुपयाचे मोबाईल व ७ हजार ९८० रुपये रोख असा एकूण २९ हजार ९८० रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने पंचा समक्ष जप्त करण्यात आल्याने पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांचे फिर्यादी वरून लाखनी पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक २४३/२०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार निलेश रामटेके तपास करीत आहेत.


0 टिप्पण्या