चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.8888117975
सोलापूर - नांदेड येथील बोंढार गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा राग मनात ठेवून अक्षय भालेराव याचा धारधार शस्त्राने खुन करण्यात आला. त्यापाठोपाठ मुंबईत संगणकीय शिक्षण घेणाऱ्या बौद्ध मुलीवर अतिप्रसंग करून तिची हत्या करण्यात आली व लातूर मध्ये सावकारकीच्या माध्यमातून मातंग युवकाची हत्या करण्यात आली. मनुवादी लोकांकडून एका पाठोपाठ एक असे खुन पडलं जात असताना मनुवादी सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. गृह विभाग तातडीची कठोर पावले उचलत नाही आणि यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवत आहे. या घटनेच्या तीव्र निषेधार्थ व सरकारने कठोर पावले उचलत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तातडीची पावले उचलावी, याकरिता सरकार ला जागे करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुक्याच्यावतीने अकलूज मधील सदुभाऊ चौकात रस्ता रोखून धरत तीव्र निदर्शने करण्यात आली.
यावेळी सुरुवातीला महापुरुषांच्या स्मारकास अभिवादन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चास सुरुवात झाली. यानंतर सदुभाऊ चौकात मोर्चा आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर जाहीर निदर्शनात झाले. रास्ता रोको व भव्य निदर्शने संपल्यांनंतर सदुभाऊ चौक याठिकाणी प्रशासनास निवेदन देण्यात आले.


0 टिप्पण्या