Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞‌

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌
‌इसवी सन २०२३ - २८ जून 
‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०७९
‌भा. रा. ७ आषाढ १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायण 
ऋतू :   ग्रीष्म 
मास :   आषाढ 
पक्ष :    शुक्ल              
तिथी :  दशमी (२७.१०) ~ एकादशी                                                       
वार :    बुधवार
नक्षत्र :   चित्रा (१६.००) ~ स्वाती         
राशी :    तुला

आशा दशमी
*पालखी सोहळा*, वाखरी, पंढरपूर 

*श्रीमती लक्ष्मीबाई तथा वंदनीय मावशी केळकर जयंती*, राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका व प्रमुख संचालिका.(तिथीनुसार)

*प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज जयंती*(तिथीनुसार)

१८३८: इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाचा राज्याभिषेक झाला.
१८४६: अ‍ॅडॉल्फ सॅक्स यांनी सॅक्सोफोन या वाद्याचे पेटंट घेतले.
१९२६: गोटलिब डेमलर आणि कार्ल बेन्झ यांनी त्यांच्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून मर्सिडीज-बेंझची स्थापना केली.
१९७२: दुसऱ्या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ झाला.
१९७८: अमेरिकेतील सर्वोच्‍च न्यायालयाने महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले.
१९८१: चीनने कैलाश मानसरोवर यात्रा करण्यासाठी सडक मार्ग उघडला.
१९८६: अविवाहित मुलींनाही प्रसूती रजा देण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला.
१९९४: विश्वकरंडक फूटबॉल स्पर्धेत रशियाच्या ओलेम सेलेन्को याने कॅमेरुनविरुद्ध पाच गोल करुन ऐतिहासिक कामगिरी केली.
१९९५: शिकाऱ्यांपासून वाघांचा बचाव करण्यासाठी व वाघांना आश्रय देण्यासाठी मध्यप्रदेश राज्याला ‘टायगर्स स्टेट’ म्हणून घोषित करण्यात आलं.
१९९७: मुष्टियुद्धात इव्हांडर होलिफील्डच्या कानाचा चावून तुकडा तोडल्यामुळे माइक टायसनला निलंबित करून होलिफील्डला विजेता घोषित करण्यात आले.

जन्मदिवस 
१७१२: फ्रेंच विचारवंत, लेखक, संगीतकार रुसो 
१९२१: भारताचे ९वे पंतप्रधान, वाणिज्य उद्योगमंत्री नरसिंह राव 
१९२८: चित्रकार, महाराष्ट्राचे कला संचालक बाबूराव सडवेलकर 
१९३७: साहित्यिक समीक्षक, दलित साहित्य, दलित चळवळीला वाहिलेल्या 'अस्मितादर्श' या त्रैमासिकाचे संस्थापक संपादक, डॉ. गंगाधर पानतावणे 
१९७६: पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्कार सन्मानित उत्कृष्ट भारतीय नेमबाज जसपाल राणा

मृत्यूदिन 
१९७२: प्रसिध्द भारतीय संख्याशास्रज्ञ तसेच इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट चे संस्थापक प्रशांतचंद्र महालनोबीस 
१९८७: व्हायोलियनवादक, गायक, संगीतज्ञ पं. गजाननबुवा जोशी 
१९९०: कवी प्रा. भालचंद्र खांडेकर 
१९९९: स्वातंत्र्य सैनिकांचे नेते, झुंजार पत्रकार रामभाऊ निसळ
२०००: उद्योजक विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग 
२००६: संत साहित्यकार, समीक्षक, वक्ते डॉ. निर्मलकुमार फडकुले

*।। दास-वाणी ।।* 

निरोधवायो न भासे । 
तैसी जाणीव न दिसे । 
न दिसे परी ते असे । 
भूतरूपे  ।। 

काष्ठी अग्नी दिसेना । 
निरोधवायो भासेना । 
जाणीव तैसी लक्षेना । 
येकायेकी  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०९/०६/२३-२४ 

पंचमहाभूतांचे व्यापार सत्व रज तमाच्या प्रभावाखाली होत असतात. यामधे सत्व म्हणजे जाणीवरूप चैतन्य.
पंचमहाभूतांचा स्थूल देह दिसतो.
सूक्ष्म चैतन्य कायम दिसेलच असे नाही.
वारा जर पडला तर तो जाणवत नाही खरा, परंतु तो अस्तित्वात असतोच.
तशी जाणीव दिसत नाही, कायम व्यक्त होतेच असेही नाही. परंतु ती स्थूल देहामधे असतेच.

लाकडामधे असलेला सूप्त अग्नी दिसत नाही. अडलेला पडलेला वारा आपल्याला वायूचे अस्तित्व नसल्याचा भास देतो. परंतु वायूही असतोच. लाकडात अग्नीही असतोच. त्याचप्रमाणे प्रत्येक जीवामधे जाणीव ही असतेच. मात्र ती चटकन लक्षात येतेच असे नाही.

गुणरूपनिरूपण समास.

 🙏 💐💐💐💐💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या