Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने काढला अर्बनचा कार्बन....!!


जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: विविध सुविधा पुरवणाऱ्या अर्बन कंपनीच्या व्यवस्थापनाने कुठलीही पूर्वसुचना न देता शेकडो महिलांना कामावरून कमी केले.

त्यामुळे त्या महिलानी शेवटचा पर्याय म्हणून आपल्याला न्याय मिळेल म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे दादर येथील श्रमीकगड कार्यालयवर धाव घेतली.व आपल्या समस्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेने समोर मांडल्या.
यावेळी सर्व महिला सदस्यांच्या समस्या व प्रश्न ऐकून घेतल्या व त्यानंतर  तुम्हाला तुमचा योग्य मोबदला व न्याय मिळेल असा ठाम विश्वास दिला.

आज अर्बन कंपनीच्या दिल्ली वरून आलेल्या व्यवस्थापनासोबत भेट घेऊन आपल्या नेहमीच्या शैलीने समज दिली. व ती समज व्यवस्थापनाला वेळीच समजली त्यानंतर त्यानी सर्व महिलांना २४ तासात त्यांचा आयडी अनब्लॉक करून कामावर घेऊ अशी सकारात्मक भूमिका घेतली.
यावेळी सर्व महिला सभासदांचा अचानक गेलेला जॉब व झालेली आर्थिक फसवणूक पासून मिळालेली सुटके नंतर सगळ्या महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण  सेनेचे अध्यक्ष श्री.राजसाहेब ठाकरे व मनसे नेते अमितसाहेब ठाकरे यांचे आभार मानले अशी माहीती गजानन नारायण राणे, सरचिटणीस,महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना यांनी दिली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या