Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रमाता जिजाऊ स्मारक सौंदर्यीकरण कामाला मराठा सेवा संघ पदाधिकाऱ्यांची भेट....

 
सुयोग ठाकरे तळेगाव दशासर जि .अमरावती 
मो .7350714675


अमरावती:-येथील स्थित कॅम्प विभागात असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या स्मारकाचे सौंदर्यीकरण अमरावतीच्या सन्मा आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या ₹ २४ लक्ष निधीतून  केले जात असून कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. मेघडंबरी प्रवेशद्वार  कंपाऊंड वॉल सह सौंदर्यीकरण असे काम प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक शिवश्री प्रकाश राऊत यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.
    आज मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष शिवश्री अरविंद गावंडे तसेच जिल्हाध्यक्ष शिवश्री आश्विन चौधरी यांच्या नेतृत्वात.मराठा सेवा संघ व  संभाजी ब्रिगेड जिल्हा पदाधिकारी यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली व माहिती घेतली.

यावेळी सभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रा मनीष पाटील,मराठा सेवा संघाचे जिल्हा पदाधिकारी शिवश्री मनोहरराव कडू,शिवश्री चंद्रकांत मोहिते, शिवश्री प्रफुल्ल गुडधे,शिवश्री राजेंद्र अढाऊ,शिवश्री गजाननराव टाले व शिवश्री रवि मोहोड हे प्रामुख्याने उपस्थित होते


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या