चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.8888117975
अकोला: - बार्शिटाकळी तालुक्यातील दगडपारवा येथील तालुका क्रीडा संकुलास माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्यात यावे, या मागणीचे निवेदन
वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा कार्यकारिणी आणि तालुका कार्यकारिणीने जिल्हा क्रीडा अधिकारी
श्री भट आणि बार्शिटाकळी तहसीलदार श्री दिपक बाजड यांना दिले.
बार्शिटाकळी पंचायत समितीच्या दिनांक २२-०७-२०२२ सर्वसाधारण सभेमध्ये दगडपारवा येथील क्रिडा संकुल इमारतीस हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव देण्यासाठी ठराव क्र. ०४ घेण्यात आला, असून सदर ठरावामध्ये दगडपारवा येथील तालुका क्रिडा संकुलास स्व. वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव देण्यात यावे या ठरावाची प्रत सुध्दा निवेदनात जोडण्यात आली.
दिनांक १ जुलै २०२३ पूर्वी तालुका क्रीडांगणाला वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव न दिल्यास वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल, तसेच १ जुलैला शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने स्वतःहून क्रीडांगणाला स्व. वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव देण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी असा इशारा ही युवा आघाडीच्यावतीने देण्यात आला.
युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, तालुकाध्यक्ष अमोल जामनिक,जिल्हा कोषाध्यक्ष तथा विझोरा पंचायत समिती सदस्य दादाराव पवार, जिल्हा मीडिया प्रमुख प्रशिक मोरे महानगर अध्यक्ष जय तायडे
महासचिव अक्षय राठोड, गोर सेनेचे विदर्भ अध्यक्ष मनोहर राठोड ,
सचिन शिराळे, ऋषिकेश खंडारे, भूषण खंडारे जिवन सावद, गणेश म्हैसने , सनी धुरंधर, निखील धाडसे, चेतन जामनिक, मंगेश धुरंधर, रोशन चोटमल रक्षण जाधव , शिलवंत ढोले, सै. आदिल, निलेश इंगळे, गोपाल चव्हाण सरपंच, गणेश चौधरी अमोल भिसे , आकाश राऊत, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या