Ticker

6/recent/ticker-posts

अहमदनगरचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे... खासदारांना बसण्यासाठी खुर्चीच नव्हती! तर पालकमंत्री यांना अपमान जनक वागणूक...

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :-  अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक  अहिल्यादेवीनगर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे नाव देण्याचे काम आमच्या काळात होते.हे आमचे भाग्य आहे.असे प्रतिपादन राज्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्रा जयंतीनिमित्त जामखेड तालुक्यातील जन्मगाव चोंडी येथे  जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी वरील घोषणा केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे , सदाशिव लोखंडे, आमदार प्रा राम शिंदे,गोपीचंद पडळकर, बबनराव पाचपुते, सुरेश धस, मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डीले, माजीमंत्री अण्णासाहेब डांगे, प्रा लक्ष्मणराव ढोबळे, माजी खासदार विकास महात्मे, माजी आमदार नारायण पाटील, रामहरी रूपनवर , पोपटराव गावडे, ,अनंतकुमार पाटील, रावराव वडकुते, भिमराव धोंडे, बाळासाहेब मुरकुटे , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे माहेरकडील वंशज बाबासाहेब शिंदे पाटील, उज्वला हाके ,डाॅ.शशिकांत तरंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले , अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य हिमालयाच्या उंचीचे होते, नामकरणामुळे नगरचे नावही हिमालयाएवढे उंचावणार असल्याचे सांगून, मुख्यमंत्री शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव केला तसेच या नामकरण सोहळ्याचे साक्षीदार होता आले हे सरकारचे व आमचे भाग्य असल्याचा उल्लेखही केला. दोन वर्षांनी अहिल्यादेवींची ३०० जयंती होत आहे, ही जयंती भव्य स्वरूपात व सर्वांना हेवा वाटेल अशी साजरी केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.  मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे आदर्शावर आम्ही राज्य कारभार करत आहेत. 
अहिल्यादेवींच्या मागच्या वर्षीच्या जन्मोत्सवात अहिल्यादेवी भक्तांना खूप त्रास झाला, मात्र, त्यानंतर २० दिवसातच आम्ही सरकार उलथून टाकले, असे सूचक भाष्य मुख्यमंत्री शिंदे यांनी मविआ सरकारचे नाव न घेता करताच उपस्थितांनी जल्लोष करीत प्रतिसाद दिला.
   राज्यात सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करत आहोत. अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले ,  धनगर समाजासाठी शेळी मेंढी सहकार विकास महामंडळाची स्थापना करून, १० हजार कोटी रूपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले आहे.

दरम्यान सामाजिक कार्यासाठी जिल्ह्यातील १४ तालुक्यातील  प्रत्येकी एका महिलेस  मुख्यमंत्री शिंदे  व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

चौकट 1  -  खासदार सुजय विखे यांना बसण्यासाठी खुर्ची च नव्हती...
प्रत्येक खुर्ची ला प्रत्येक नावाचे स्टिकर लावले होते पण सुजय विखे यांच्या नावाचे कोणत्याच खुर्चीला स्टिकर नव्हते, त्यामुळे सुजय विखे दोन खुर्चीच्या मध्यभागी बसले होते.
चौकट 2  - अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यादेवीनगर करण्याची घोषणा मुख्यमंत्री करणार होते त्यामुळे या कार्यक्रमात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भाषणाची संधी देणे आवश्यक होते. पण पवार विरोधक प्रसिद्ध असलेले गोपीचंद पडळकर यांना बोलण्याची संधी देण्यात आ. राम शिंदे यांना धन्यता वाटली. शेवटी आभार प्रदर्शनासाठी पालकमंत्री विखे पाटील उठले ते आभार मानीत असताना व्यासपीठावरील मान्यवर उठून चालले होते. यामुळे या कार्यक्रमात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा अप्रत्यक्ष अपमान करून चार दिवसापूर्वी आ. राम शिंदे यांना खुर्ची न दिल्याची चर्चा होती.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या