चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.8888117975
नाशिक :- कानडगाव शिवारात दोन कुटुंबात हाणामारी घरावर केली दगडफेक तर चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
चांदवड तालुक्यातील कानडगाव शिवारात दोन कुटुंबात हाणामारी झाली या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाणफोई फाटा येथे बापू दशरथ जगताप राहणार कानडगाव, यांच्या घराजवळ दिनांक 19 जून रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास विनायक काबू कारंडे, शंकर पारू बिडगर, बाळू बबन बिडगर, सुनील विजय भुसारे, यांनी बापू दशरथ जगताप यास तू कानडगाव फाटा येथे राहायचे नाही, तू येथे राहिला तर तुला मारून टाकून असा दम दिला.
यावरून बापू जगताप व त्यांची पत्नी समजावून सांगण्यात गेली असता. हे विचारण्याचे चौघांना याचा राग आला. व ते मारहाण करू लागले म्हणून त्याची पत्नी व मुलगा सोडवण्यास गेले असता. विनायक काबू कारंडे यांनी त्यांच्या हातातील गजाने पत्नीच्या उजव्या कानावर गंभीर जखम केली. तर शंकर पारु बिडकर यांनी दगड फेकून कानावर मारल्याने गंभीर जखमी झाली. बाळू बबन बिडगर व सुनील विजय भुसारे यांनी बापू जगताप यांच्या दारावर दगडफेक करून शिवगाळ केली. अशी फिर्याद दिल्याने बापू जगताप यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हवालदार अशोक पवार हे करीत आहे.


0 टिप्पण्या