सुहास पाटील ठाणे जिल्हा विशेष प्रतिनिधी.( चित्रा न्यूज महाराष्ट्र राज्य ) मो.नं. ९३२१३८८९७१
ठाणे : जिल्ह्यातील ठाणे नगर पोलीस स्टेशनच्या वतीने बकरी ईद आणि आषाढी एकादशी निमित्त पोलीसांचा रुट मार्च काढण्यात आला. समाजात शांतता सुव्यवस्था टिकऊन ठेवण्याच्या हेतून सामाजिक शांततेसाठी हा रुट मार्च काढण्यात आला होता.
दिनांक २९ जुन २०२३ रोजी बकरी ईद आणि आषाढी एकादशी आहे.
हिंदू आणि मुस्लिम धार्मियांचे सण एकाच दिवशी आले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सामाजिक सलोखा कायम राहवा. या उद्देशाने हा रुट मार्च आयोजित करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रियंका ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक विघा पाटील यांच्यासह दहा पोलीस आधिकारी . एक एस आरपी आणि पोलीस कर्मचारी या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते.
ठाणे नगर पोलीस स्टेशन येथून निघालेला हा रुट मार्च अशोक सिनेमा . सिडको रोड. महागिरी .जांभळी नाका. या मार्गाने पुन्हा पोलीस ठाणे येथे विसर्जित करण्यात आला.


0 टिप्पण्या