Ticker

6/recent/ticker-posts

गडेगाव येथे नालंदा वाचनालयाचा वर्धापन दिन साजरा

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324

भंडारा:-लाखनी तालुक्यातील गडेगाव येथील नालंदा वाचनालय आणि अभ्यासिका केंद्रास ४ वर्ष पूर्ण झाल्या प्रीत्यर्थ ४था वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी, प्रमुख अतिथी पंचायत समिती सदस्या मनीषा हलमारे, तमुस अध्यक्ष दिलीप कच्छवाय, माजी उपसरपंच अनिल हारोडे, पोलिस पाटील डूडीराम भैसारे, ग्रामपंचायत सदस्य आरती नंदेश्वर, सल्लागार समिती सदस्य अजित टेंभूर्णे, केशव फसातर, प्रामुख्याने उपस्थित होते. या वाचनालयाचे माध्यमातून ग्रामीण परिसरातील वाचकांची बौद्धिक भूक भागविण्याची काम केले जात आहे. त्यामुळे हे वाचनालय वाचकांसह जनतेच्या पसंतीला पडले आहे. असे पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले. यावेळी इयत्ता १०वी व १२वीत प्रविण्याने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन जितेंद्र भैसारे तर आभार श्रेयस टेंभूर्णे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी व युवक वर्ग यांचेसह गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या