Ticker

6/recent/ticker-posts

विरार येथे वंचितच्यावतीने करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न


चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.8888117975

वसई: - वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने आयोजित करिअर मार्गदर्शन व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ विरार पुर्व येथील स्टेशनच्या जवळ असलेल्या महानगर पालिका वाचनालय येथे पार पडला. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहुन करिअर मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी सुधाकर इंगळे, संतोष कवडे, अनिरुद्ध कांबळे, जनार्दन लोखंडे मार्गदर्शक म्हणून प्रशांत बचुटे सर, करिअर कौन्सिलर आणि मोटिवेटर सुनील गायकवाड युवा क्रांती संघ, करिअर कौन्सिलर आणि मोटिव्हेटर प्रशांत चव्हाण सर, करिअर कौन्सिलर आणि मोटिवेटर एडवोकेट गिरीश दिवाणजी, संघर्ष सामाजिक संघटना संस्थापक मनोज रुके, व्हाईट वेदर निधीचे डायरेक्टर एकनाथ निकम, बहुजन पँथरचे अध्यक्ष कीर्तीराज लोखंडे, गौरी फॅसिलिटी सर्विसेसचे विशाल खैरे यासह वंचित बहुजन महिला आघाडीच्या सर्व महिला पदाधिकारी सभासद कार्यकर्ते महिला उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या