चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.8888117975
नागपूर : - वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नांदेड जिल्ह्यातील बोंडार या गावातील अक्षय भालेराव नावाच्या भिमसैनिकाची क्रूरपणे हत्या करण्यात आली. ही घटना अत्यंत निंदनीय आहे लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. फुले, शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रात आंबेडकरी तरुणाला जीवे ठार मारणाऱ्या गावगुंडांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या खून प्रकरणातील अजून काही आरोपी फरार आहेत त्यांना तात्काळ अटक करावी. आरोपीवर ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करावा. व मयत अक्षय भालेराव याच्या परिवाराला पोलीस बंदोबस्त देऊन त्यांच्या परिवारातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी तसेच त्यांच्या कुटुंबाला 50 लाखाची आर्थिक मदत मिळावी व त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, असे निवेदन रावेर तहसीलदार बी. ए. कापसे साहेब यांना देण्यात आले.
सदर या घटनेचा वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने जाहीर असा तीव्र निषेध करण्यात येत आहे. तसेच अक्षय भालेराव या तरुणाच्या कुटुंबीय यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष व आंबेडकरी समाज मोठ्या ताकदीने उभा आहे याची शासनाने नोंद घ्यावी.
वंचित बहुजन आघाडी रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे तालुका उपाध्यक्ष सलीम शहा यासीन शहा, तालुका सचिव राजेंद्र अवसरमल, तालुका उपाध्यक्ष सुरेश अटकाळे, तालुका संघटक कंदर सिंग बारेला, रतन भालेराव ,किरण पोहेकर ,अजय तायडे, दौलत अडांगळे ,नितीन तायडे ,शेख इमरान शेख रमजान ,संदीप हिवरे ,योगेश निकम ,श्रावण पाटील ,कैलास धनगर ,सुनील सोनार ,किशोर सूरदास , युवराज तायडे ,प्रदीप खैरे, प्रवीण निकम ,इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या