Ticker

6/recent/ticker-posts

"त्या" अपघातातील जखमींचा मृत्यू

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324

भंडारा :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(जुना ६) वरील गुंथारा/फाटा येथे १६ जून रोजी महामार्ग ओलांडताना चारचाकीने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात सुरेश रामचंद्र बांडेबुचे रा. खुर्शीपार हा गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला शासकीय वैद्यकिय महाविद्यालय नागपूर येथे भर्ती करण्यात आले होते. त्याचा उपचारा दरम्यान सोमवारी(ता. १९) मृत्यू झाला. 
           राजू मस्के व सुरेश बांडेबुचे कामानिमित्त दुचाकीने धारगाव ला गेले होते. काम आटोपून परतीच्या प्रवासात गुंथारा/फाटा लगतचा महामार्ग ओलांडतांना लाखनी कडून भंडारा कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कार क्रमांक एमएच ३१ एफए ३६५७ ने दुचाकीस धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी नेत असताना वाटेत राजू मस्के याचा मृत्यू झाला होता. तर सुरेश बांडेबुचे याला सामान्य रुग्णालय भंडारा येथे भर्ती करण्यात आले होते. प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे प्रथमोपचार करून त्याला शासकीय वैद्यकिय महाविद्यालय नागपूर येथे पाठविण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा सोमवारी मृत्यू झाला. अपघातानंतर कार झाडाला आदळल्याने कार चा चेंदामेंदा झाला. पण कार मधील चालक व प्रवाशांनी सीटबेल्ट लावलेले असल्याने कार मधील एअर बॅग उघडल्याने कुणालाही इजा झाली नाही. हे विशेष.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या