Ticker

6/recent/ticker-posts

बीआरएस च्या वाढत्या प्रभावाने सत्ताधाऱ्यांची झोप उडाली


• भाजपा तील नेते मंडळी बीआरएस च्या गळाला

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324


भंडारा :- तेलंगाणा चे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव(केसीआर) यांनी तेलंगाणा राष्ट्र समिती(टीआरएस) चे रूपांतर भारत राष्ट्र समिती(बीआरएस) मध्ये करून पक्ष वाढीसाठी महाराष्ट्रात पाय रोवले. जिल्ह्यातील तुमसर चे माजी आमदार चरण वाघमारे यांचेसह भाजपातील एक वर्ग बीआरएस च्या समर्थनात समोर आल्याने सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. बीआरएस ने १५ दिवसांत १२ हजार सदस्य नोंदणी केली आहे. 
             तेलंगाणा तील केसीआर सरकार ने शेतकरी हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने तेथील शेतकरी स्वयंपूर्ण होण्याचे मार्गावर आहे. तोच कित्ता महाराष्ट्रात गीरवण्यासाठी के. चंद्रशेखर राव प्रयत्नशील आहेत. पक्षाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने त्यांनी विदर्भातील नागपूर या ठिकाणी जाहीर सभा घेतली. तुमसर चे माजी आमदार चरण वाघमारे यांचेसह मच्छीमार संघाची माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश मालगावे, भंडारा विधानसभा क्षेत्राचे भाजपाचे माजी उमेदवार अरविंद भालाधरे, धनंजय मोहरकर, अरुण भेदे, संजय खंडाइत, भास्कर हटवार तसेच अनेक कार्यकर्ते बीआरएस शी जुळत असल्यामुळे जिल्ह्यात बीआरएस ची ताकत सातत्याने वाढत असल्याने सत्ताधाऱ्यांची झोपमोड होत आहे. 
              २५ मे पासून बीआरएस च्या वतीने जिल्ह्यात सदस्य नोंदणी केली जात आहे. अवघ्या १५ दिवसांत १२ हजार ऑनलाईन सदस्य नोंदणी झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. जिल्ह्यात बाहेरील एका भाजपा नेत्यामुळे माजी आमदार चरण वाघमारे यांची भाजपा तून हकालपट्टी करण्यात आल्याने चरण वाघमारे यांचे समर्थक नाराज आहेत. त्यामुळे येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला रामराम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
                सत्ताधारीही पडझड होऊ नये म्हणून प्रयत्नशील असून जिल्ह्यात बड्या नेत्यांसह प्रदेशाध्यक्ष व स्थानिक नेत्यांनी दौरे सुरू केले असल्यामुळे बीआरएस ची तर धास्ती घेतली नाही ना. अशा चर्चांना ऊत आला आहे. सत्ताधारी पक्ष ज्या वर्गाच्या भरोशावर सत्तेची चव चाखतो तोच वर्ग बीआरएस शी जुळण्याची शक्यता असल्यामुळे सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या