चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्यूज मो.८८८८११७९७५
बीड जिल्हा -: महाराष्ट्रातील शासकीय गायरान जमिनीवरील शेतीसाठी अतिक्रमणे आणि गायरान जमिनीवरील असलेल्या घरांचे बांधकामे वाचण्यासाठी आमदार सुरेश धस यांच्या मध्यस्थीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे शिष्टमंडळ लवकरच भेटणार असल्याची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम चे बीड जिल्हा अध्यक्ष यशवंत खंडागळे साहेब यांनी बैठकीदरम्यान प्रसार माध्यमांना सांगितले आहे .
पुढे सांगितले की , आदिवासी, दीन, दलीत, भटके, विमुक्त समाजातील भूमिहीन शेतमजूर घटकांनी आपल्या उपजीविकेसाठी गायरान जमिनीवरील केलेले अतिक्रमण शासनाने नियमानुकुल केल्याशिवाय समाजामध्ये सामाजिक समरसता निर्माण होणार नाही , त्यामुळे गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यात यावे आणि शेतमजुरांच्या नावे सातबारा मिळेपर्यंत आपण या अतिक्रमणधारकांच्या बाजूने खंबीरपणे उभे असून , राज्यात ४ लाख २३ हजार गायरान धारक अतिक्रमित्ताचा हा मोठा प्रश्न असून यामध्ये अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती जमाती भूमिहीन शेतमजुरांचा हा उपजीविकेचा प्रश्न असल्याने हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आमदार सुरेश ( अण्णा ) धस यांच्या मध्यस्थीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे आयोजित केलेल्या बैठकीत जाहीर केले .
याप्रसंगी आष्टी तालुका अध्यक्ष गेनबाप्पा साळवे, युवक तालुका अध्यक्ष बाळासाहेब घाट विसावे ,दिनकर वाघमारे, गौतम शैकडे, विष्णू काळे पाटील , संजय काकडे , नानाभाऊ ससाने , किशोर खंडागळे ,मयूर शिंदे, शशिकांत चदनशिव, अजय बोराडे, शंकर निकाळजे, सुंदर गायकवाड, सुभाष माळी ,परसराम अडागळे, अशोक कोरडे, कैलास माळी , विश्वनाथ बर्डे , रावसाहेब पिंपळे , भगवान पालवे ,विजय बर्डे ,हरीभाऊ वालेकर, पाराजी सोनवणे, उद्धव फुलवले ,रामभाऊ आढाव, अंबादास कांबळे , मनोहर साबळे ,राहुल घाटविसावे, किसन काळे, बाबासाहेब खंडागळे ,मनोहर साबळे, लताबाई काळे, गोरख माळी , अब्बास काळे , सुभाष कांबळे , महादेव शिंदे , किरण जावळे आदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे पदाधिकारी , गायरान जमीन धारक शेतकरी, गावठाण जमीन वरती पक्के बांधकामे करणारे शेतमजूर बांधव या प्रसंगी उपस्थित होते .


0 टिप्पण्या