अंगद भांडवलकर सोलापूर
सोलापूर:-भारतीय जनता पार्टी करमाळा तालुका व पतंजली योग समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून बुधवार दि. २१ जून रोजी करमाळ्यात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपाचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी दिली.
योगामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक बदल घडतात. शारीरिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी नागरिकांनी दररोज योग करून आपले शरीर जपावे. या शिबिरात पतंजली योग शिबिराचे शिक्षक म्हणून हनुमानसिंग परदेशी, रामचंद्र कदम सर, आरकिले सर, प्रवीण शहाणे सर आपणास योग शिबिराचे प्रशिक्षण देणार आहेत.
कन्या प्रशाला श्रीदेवीचामाळ रोड, करमाळा येथे बुधवार दि. २१ जुन रोजी सकाळी सात वाजता हे शिबिर होणार आहे. तरी या शिबिराला करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे व पतंजली योग समिती तर्फे करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या