Ticker

6/recent/ticker-posts

कुलूप बंद घरात घरफोडी, सोन्याचे दागिने लंपास

• केसलवाडा/फाटा येथील घटना 

• १ लाख १८ हजाराचा माल लंपास

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324

भंडारा :- केसलवाडा/फाटा येथील कुलूप बंद घर पाहून अज्ञात आरोपीने समोरील दरवाज्याचा ऑटोमॅटिक ताला तोडून घरात प्रवेश करून सोन्याचे दागिन्यांसह १ जुना मोबाईल मिळून १ लाख १८ हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी(ता.१८) रात्री ९:०० वाजता दरम्यान उघडकीस आली. लाखनी पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे. 
             यातील फिर्यादी आरती मिलिंद मेश्राम ह्या केसलवाडा/फाटा येथे कुटुंबासह वास्तव्यास असून १७ जून चे सायंकाळपासून तर १८ जून चे रात्री ९:०० वाजतापर्यंत कामानिमित्त बाहेर गेल्याने घरास कुलूप बंद केले होते. अज्ञात आरोपीने सूना मौका पाहून समोरील दाराचा ऑटोमॅटिक ताला तोडून घरात प्रवेश करून जुने वापरातील २ सोन्याचे गोप २४ ग्राम ८० हजार रुपये, १ सोन्याचा मंगळसूत्र १३ ग्राम ३० हजार रुपये, सोन्याचे लटकन ३ ग्राम ५ हजार रुपये, १ रेडमी कंपनीचा जुना मोबाईल किंमत ३ हजार रुपये असा एकूण १ लाख १८ हजार रुपयाचा माल चोरून नेला. फिर्यादी घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आल्याने पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी क्षणाचा विलंब न लावता घटनास्थळ गाठले. लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक २३१/२०२३ अन्वये गुन्हा दाखल करून स्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण केले. कलम ४५४, ४५७, ३८० भादवि नुसार पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चीलांगे तपास करीत आहेत. वृत्त लिही पर्यंत चोरांचा शोध लागला नव्हता. या घटनेने केसलवाडा/फाटा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या