Ticker

6/recent/ticker-posts

बहुचर्चित भूखंड घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे


जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांची कार्यवाही

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324

भंडारा :-लाखनी येथील भूमाफिया टोळी आणि नगररचना व महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बनावट आदेश पारित करून शासनाचा कोट्यावधी चा महसूल बुडविल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता भूमाफियासह शेतकरी, महसूल व नगररचना कार्यालयातील ७ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्या नंतरही अनेक अधिकाऱ्यांवर टांगती तलवार असल्याने पोलिसांवर आरोप प्रत्यारोप करून पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याच्या प्रयत्न चालविला गेल्याने पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी शनिवार(ता.२४) रोजी बहुचर्चित भूखंड घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा भंडाराकडे वर्ग केला आहे. 
             लाखनी येथील भूमाफिया टोळीने मागील १२ ते १५ वर्षापासून धान उत्पादक शेतकऱ्यांकडून उपजाऊ शेतजमिनी विकत घेऊन त्यावर ले-आऊट तयार करून प्लॉट विक्री चा गोरखधंदा राजरोसपणे सुरू होता. या करिता एका उपविभागीय महसूल अधिकाऱ्याचे नावाने बनावट अकृषक आदेश पारित केले. तथा नगररचना कार्यालयाचे बनावट शिफारस पत्र तयार करून आपला हेतू साध्य केल्याने प्लॉट धारक व शासनाची फसवणूक झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे आदेशावरून लाखनी पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक ५/२०२३ कलम ४०९, ४१८, ४२०, ४६२, ४६७, ४६८, ४७१, ४७३, ३४, १२०(ब) भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला भूमाफिये, शेतकरी २ व नगररचना विभागातील २ लीपिकांचा समावेश होता. त्यानंतर जसजसा तपास वाढत गेला. तसतशी अनेक लोकसेवकाचा समावेश असल्याचे दिसून आल्याने २ सेवानिवृत्त तहसीलदार, २ दुय्यम निबंधक आणि नगररचना विभागातील १ अधिकारी यांना आरोपी करण्यात आले. पोलिस नगररचना व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेतूपुरस्पर त्रास देऊन नाहक गुन्ह्यात अडकवित असल्याचा गैरसमज झाल्याने कार्यवाहीत शिथिलता आणण्यासाठी पोलिसांवर दबाव निर्माण करून बदनाम करण्याचे प्रयत्न झाले. ही बाब जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांचे निदर्शनास आली असता त्यांनी भूखंड घोटाळ्याचा लाखनी पोलिसांकडून तपास काढून आर्थिक गुन्हे शाखा भंडाराकडे सोपविला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या