सोमनाथ खंडागळे जिल्हा प्रतिनिधी सोलापूर मो. 86002 70199
सोलापूर :-सदाशिवनगर व पुरंदावडे मध्ये संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आगमन झाले. यावेळी रिंगण सोहळ्याचे व माउलींच्या पालखीचे स्वागत अश्वाचे पूजन पंचायत समितीचे माजी उपसभापती मा.श्री.अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचे शुभहस्ते सपत्नीक माजी सभापती सौ.वैष्णवीदेवी मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते केले, यावेळी *बळीराजाने देखील माउलींच्या स्वागतासाठी आपली उपस्थिती दर्शविली.यावेळी विधानपरिषद आमदार मा श्री रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शंकर सहकारी कारखाना लि सदाशिवनगर यांच्या वतीने १० हजार वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. राणी मोहिते, देविदास ढोपे, सरपंच विरकुमार दोशी, उपसरपंच उदय धाईंजे, तानाजी ओवाळ, पोपट गरगडे, माऊली सूळ, विठ्ठल तात्या अर्जुन,पांडुरंग सालगुडे -पाटील,राहुल वाघमोडे, अरविंद भोसले, दादा वाघमोडे, बिनु पाटील, संतोष शिंदे तसेच श्री शंकर सहकारी संचालक दत्तात्रय रणवरे, चंद्रकांत शिंदे, शिवाजी गोरे, सुनील माने, नंदन दाते, कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, क. बा. पा. विद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी तसेच सदाशिवनगर व पुरंदावडे ग्रामपंचायत चे सदस्य, ग्रामस्थ व पोलिस मित्र स्वयंसेवक उपस्थित होते. या सोहळ्यास *माऊलींच्या पालखीचे पहिले गोल रिंगण ठिकाणी बळीराज्याचे आगमनाने वारकारी तसेच शेतकरी देखील सुखवाला व सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.*


0 टिप्पण्या