सोमनाथ खंडागळे जिल्हा सोलापूर प्रतिनिधी मो.8600270199
सोलापूर-: जयसिंह मोहिते पाटील मार्गदर्शनाखाली व मा संग्रामसिंह मोहिते पाटील यांचे अध्यक्षतेमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज याठिकाणी स्वतंत्र मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांचे संयुक्त विदयमाने फिल्ड ऑफिसर व सीनियर फिल्ड ऑफिसर या पदासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते.
या रोजगार मेळाव्याचे उद्धाटन महाविदयालयाचे प्र. प्राचार्य डॉ दत्तात्रय बागडे यांचे हस्ते व कंपनीचे एच आर साईरेडी आईनलावार , रिजनल मॅनेजर उमाकांत मोरे साहेब.
देवेंद्र रौरळ, नितीन साहेब, महाविद्यालय प्लेसमेंट ऑफिसर डॉ विश्वनाथ आवड यांचे प्रमुख उपस्थितीत झाले.
संपुर्ण भारतात कार्यरत असलेल्या स्वतंत्र मायक्रोफिन या बिर्ला ग्रुप कंपनीच्या कँम्पस मुलाखती मध्ये आज अकलूज, इंदापूर, मंगळवेढा, टेंभुर्णी येथील जागासाठी एकुण 116 जण सहभागी झाले होते. त्यापैकी 48 जण मुलाखतीस पात्र ठरले व अंतिमतः 14 जणांची निवड करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आली. कागदपत्राची पुर्तता केल्यानंतर आणखी किमान 11 जणांची निवड होवू शकते असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
कँम्पस मुलाखतीचे यशस्वी आयोजन महाविदयालयाचे प्लेसमेंट ऑफिसर डॉ विश्वनाथ आवड, अधिक्षक युवराज मालुसरे, सुरज ननवरे, हितेश पुंज, नागन्नाथ साळवे, प्रकाश भोसले, समाधाऩ शेंडगे, मनोज साठे, रोहित भुईटे, प्रतिक फुले, लोंढे मामा यांनी केले


0 टिप्पण्या