Ticker

6/recent/ticker-posts

साहित्याच्या अल्प वापरामुळे पुलाचे बांधकाम निकृष्ट प्रतीचे

• निमगाव जेवनाळा नाल्याचे पुलावरील प्रकार

• निर्माणाधिन पुलास पडल्या भेगा

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324


भंडारा :- रस्ते व पुल विकासाकरिता शासन प्रयत्नशील असून यासाठी अनेक योजनांचे माध्यमातून आवश्यक तो निधीही उपलब्ध करतो. पण "कुंपणच शेत खाते" या प्रमाणे काही कमिशन खोर अभियंत्यामुळे फलनिष्पत्ती होत नाही. याचा प्रत्यय निमगाव ते जेवनाळा रस्त्याचे नाल्यावरील पुल बांधकामात आला. कनिष्ठ अभियंता व कंत्राटदाराचे संगनमताने साहित्याचा अल्प प्रमाणात वापर केल्याने बांधकाम निकृष्ट झाल्यामुळे पूलावर भेग पडली असल्याच्या चर्चा होत आहेत. 
             निमगाव येथील जनतेचा जेवनाळा गावाशी प्रत्यक्ष संबंध येतो. अनेक शेतकऱ्यांच्या नाल्यापलीकडे शेतजमिनी आहेत. तर शिक्षणासाठी बहुसंख्येने विद्यार्थी जेवनाळा येथे जात असतात. पण निमगाव ते जेवनाळा रस्त्यावर नाला असल्यामुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांचीही गैरसोय होत असे. गावकऱ्यांचे मागणीवरून आमदार नाना पटोले यांचे प्रयत्नाने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ३ कोटी अंदाजपत्रकिय रकमेच्या पुल बांधकामास मंजुरी प्रदान करण्यात आली. निविदा पद्धतीने बांधकामाचे कंत्राट मे. भोजवानी कन्स्ट्रक्शन कंपनी नागपूर यांना देण्यात आले. यावर तांत्रिक मार्गदर्शन, देखरेख व सनियंत्रणाचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभागीय साकोली चे कनिष्ठ अभियंता पाल यांचेकडे सोपविण्यात आले होते.
              पुल बांधकामाचा करारनामा मे. भोजवानी कन्स्ट्रक्शन कंपनी चे नावाने करण्यात आला असला तरी निमगाव ते जेवनाळा नाल्यावरील पुलाचे बांधकाम टक्केवारीने पालांदूर चे एका कंत्राटदारास देण्यात आले होते. त्याने राजकीय दबावाचा वापर करून संबंधित कनिष्ठ अभियंत्याचे संगनमताने साहित्याचा अल्प प्रमाणात वापर करून पुल बांधकाम निकृष्ट प्रतीचे केल्याने पुलावर भेगा पडल्या असल्याच्या चर्चा होत आहेत. वरिष्ठ पातळीवरून या पुल बांधकामाची चौकशी झाल्यास सत्यता समोर येण्यास फार वेळ लागणार नाही. 

माहिती व सूचना फलक नाही

शासकीय योजनेची कामे करताना बांधकामाचे दर्शनी भागात बांधकाम सुरू होण्यापूर्वी माहिती व सूचना फलक लाऊन त्यावर कामाचे नाव, कंत्राटदाराचे नाव, आर्थिक वर्ष, एजेंसी चे नाव, अंदाजपत्रकिय रक्कम, काम सुरू झाल्याचा दिनांक व काम पूर्ण झाल्याचा दिनांक लिहिण्याच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना असल्या तरी निमगाव ते जेवनाळा नाल्यावरील पुल बांधकामाचे ठिकाणी  माहिती व सूचना फलक नाही.
*ॲप्रोच रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य(चौकट)*
नाल्यातील पुलाचे बांधकाम झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या काठाकडे मती, मुरूम भरून खडीकरण व त्यावर डांबरीकरण करून ॲप्रोच रस्ता तयार केला जातो. पण निमगाव ते जेवनाळा रस्त्यावरील पुलाच्या दोन्ही कडा मातीने भरण्यात आल्याने रस्ता चिखलमय होऊन आवागमन करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. 

प्रतिक्रिया

पुलाचे बांधकाम झाल्यावर व्हेअरींगकोट केला जातो. व्हेअरींगकोट ला मायनर क्रॉक आहे. पावसाळा सुरू असून नाल्यात पाणी असल्यामुळे पुलाचे परीक्षण करता येत नाही. पुलाचे काम अपूर्ण असून आवश्यकता भासल्यास तृट्या दूर केल्या जातील. 

डी.एस. मटाले, उपविभागीय अभियंता सा. बा. उपविभाग साकोली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या