Ticker

6/recent/ticker-posts

"त्या" मजुरांचे कुटुंबास विम्याचा लाभ द्यावा

• माजी जि. प. सदस्य आकाश कोरे यांची मागणी 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324

भंडारा :-लाखनी तालुक्यातील खैरी/पिंपळगाव येथे निर्माणाधिन जलकुंभावर ३० ते ३२ फूट उंचीवर काम करीत असताना तोल जाऊन खाली पडल्याने राकेश विश्र्वपाल उके(२२) रा. चीचाळ, तालुका पवनी याचा मृत्यू झाला. तो कुटुंबातील कमावता पुरुष असल्याने त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्याचे कुटुंबास विम्याचा लाभ देण्यात यावा. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश(हेमंत) कोरे यांनी केली आहे. 
             ग्रामीण परिसरातील जनतेला पिण्याचे शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे. या करिता खैरी येथे जलजीवन मिशन अंतर्गत आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. नवीन जलकुंभ, जलस्त्रोत, पाइपलाइन व स्विच रूम असे बांधकामाचे स्वरूप होते. हे काम अरविंद कन्स्ट्रक्शन कंपनी भंडारा यांना देण्यात आले होते. यावर तांत्रिक मार्गदर्शन, देखरेख व सनियंत्रणाचे काम उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग साकोली च्या कनिष्ठ अभियंता श्रुती मेघे यांचेकडे सोपविण्यात आले होते. त्या प्रसूती रजेवर गेल्याने सध्या या कामावर देखरेखीचे काम कनिष्ठ अभियंता हलमारे मॅडम यांचेकडे आहे. 
              या कामावर चीचाळ, तालुका पवनी येथील मजूर काम करीत होते. रविवार ९ जुलै २०२३ ला दुपारचे सुमारास जलकुंभावर ३० ते ३२ फूट उंचीवर काम करतांना राकेश विश्र्वपाल उके तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शासकीय कामाचे कंत्राट देताना कार्यरत मजुरांचा विमा उतरविला जात असल्याने मृतक राकेश उके याचे कुटुंबास विम्याचा लाभ देण्यात यावा. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश(हेमंत) कोरे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या