Ticker

6/recent/ticker-posts

सातारा तालुक्यातील कोतवाल आरक्षण सोडत जाहिर

रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515

 सातारा : सातारा तालुक्यातील कोतवाल पद रिक्त सजाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवड समितीच्या उपस्थितीत सभागृह, तलाठी निवास बस स्टँड सातारा समोर शुक्रवार दि. 14 जुलै 2023 रोजी दुपारी 04.00 वाजता काढण्यात आली. ही आरक्षण सोडत सुधाकर भोसले, उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष, राजेश जाधव, तहसिलदार सातारा तथा सदस्य सचीव, पोपट कोकरे सदस्य कोतवाल भरती निवड समिती व नागरिक यांचे उपस्थितीत पार पडली. कोतवाल आरक्षण 2023 सोडत प्रवर्गनिहाय सजांची माहिती पुढीलप्रमाणे
  सातारा- खुला प्रवर्ग, दरे बु.- खुला प्रवर्ग, कुसवडे- खुला महिला, आंबवडे खु.-अनुसुचित जमाती, आंबवडे बु- खुला प्रवर्ग, करंडी- खुला प्रवर्ग, ठोसेघर- खुला प्रवर्ग, कामथी तर्फे सातारा- खुला प्रवर्ग, कामथी तर्फ परळी- खुला प्रवर्ग, वर्ये- इतर मागास वर्ग, गोवे- खुला प्रवर्ग , कण्हेर- ईडब्लुएस महिला, नुने- ईडब्लुएस, आष्टे-अनुसुचित जमाती, वडगांव- इतर मागासवर्ग महिला, कोडोली- खुला महिला, निनाम- खुला महिला, पाटखळ- खुला प्रवर्ग, शिवथर- खुला महिला, उपरोक्त प्रमाणे 20 सजासाठी अंतिम कोतवाल आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. तसेच उर्वरित 5 सजे भाटमरळी, परळी, आलवडी , काशिल, व अतीत हे सजे आरक्षण सोडतीच्या कोणत्याही टप्यात चिठठी मधून आलेले नाहीत. त्यामुळे सदर सजे आरक्षणासाठी विचारात घेण्यात आले नाहीत, असे सदस्य सचिव, कोतवाल निवड समिती तथा तहसिलदार राजेश जाधव यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या